‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री आहे ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तुम्हाला अभिनेता अभिजीत खांडकेकर माहितीच असेल. अभिजीत म्हणजेच माझ्या नवऱ्याची बायकोमधील गुरुनाथ अर्थातच गॅरी. त्याची पत्नी सुखदा खांडकेकर हिला अनेकजण ओळखत नसतीलही. सुखदा आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे. काही फोटो सुखदाचा हॉट अंदाजही पाहायला मिळत आहे. मराठीतील काही मोजक्याच अशा अभिनेत्री आहेत ज्या आपले हॉट आणि बोल्ड फोटो सोशलवर शेअर करत असतात.

अशी आहे दोघांची लव्ह स्टोरी
सुखदाच्या मादक अदांनी चाहत्यांना मोहिनी घातली आहे. अभिजीत आणि सुखदाची लव्ह स्टोरी अनेकांना माहिती नसेल. अभिजीत माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेत काम करत होता. ही मालिका आणि अभिजीत खूप लोकप्रिय झाले होते. यावेळी सुखदा आणि अभिजीत फेसबुकवरून पहिल्यांदा भेटले. दोघंही मूळचे नाशिकचे होते. अभिजीतच्या नाटकातील आणि सुखदाच्या डान्समधील एक कॉमन फ्रेंड होता ज्याच्यामुळे दोघांची ओळख झाली होती. परंतु दोघं कधीही एकमेकांशी जास्त बोलले नाही.

…आणि दोघांचं सुत जुळलं
नाशिकचा मुलगा मालिकेत एवढं चांगलं कम करत आहे हे पाहून सुखदाने अभिजीतचे फेसबुकवरच कौतुक केले. नंतर दोघांची छान मैत्री झाली. हळूहळून याचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर अभिजीतनं तिला प्रपोज करत एकमेकांबद्दल विचार करायला हरकत नाही असं म्हटलं. तिने त्याचं प्रपोजल अ‍ॅक्सेप्ट केलं. 1 फेब्रुवारी 2013 रोजी दोघंही विवाहबद्ध झाले.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर अभिजीत सध्या माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत काम करत आहे. सुखदाबद्दल सांगायचे झाले तर, तिने नाटक, सिनेमात काम केलं आहे. डॉ अमोल कोल्हेंसोबत हीच तर प्रेमाची गंमत या नाटकात तिने काम केलं आहे. याशिवाय धरा की कहानी या हिंदी मालिकेतही तिने काम केलं आहे. बाजीराव मस्तानी या सिनेमातही तिने रणवीरच्या बहिणीची म्हणजेच अनुबाईंची भूमिका साकारली होती. अनसेन्सॉर्ड हा सुखदाचा चॅट शोदेखील फेमस आहे.

 

Visit : policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like