अमृता खानविलकरनं दाखवलं ‘क्लीव्हेज’, हॉटनेसनं चाहते क्लीन ‘BOLD’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री अमृता खानविलकर मराठी इंडस्ट्रीतील अशी अभिनेत्री आहे जी हिंदी सिनेमांमध्येही सक्रिय आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने आपलं वेगळं स्थान तयार केलं आहे. नुकतीच अमृता खानविलकर सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे अमृताचे बोल्ड फोटो. अमृताने इंस्टाग्रामवर शेअर केलेले तिचे काही बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अमृता खानविलकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. चाहत्यांसाठी आपले वेगवेगळे फोटो सोशलवरून नेहमीच शेअर करत असते. असेच तिचे काही लेटेस्ट फोटो समोर आले आहेत. यात अमृताचा हॉट अवतार पाहायला मिळत आहे. शॉर्ट निळ्या ड्रेस मध्ये बोल्ड पोज देणारी अमृता चाहत्यांना खूपच आवडली आहे.

अमृता ही केवळ अभिनेत्रीच नाही तर ती एक डान्सरही आहे. आपल्या डान्सने तिने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख केली आहे. पती हिमांशूसोबत नच बलिए हा डान्स रिअ‍ॅलिटी शोदेखील तिने जिंकला आहे. चाहते तिच्या डान्सवरही फिदा आहेत.

अमृताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, लवकरच ती पॉन्डेचेरी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय राझी आणि सत्यमेव जयते अशा हिंदी सिनेमात काम केलेली अमृता लवकरच मलंग सिनेमातही दिसणार आहे. नुकतीच या सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. इतकेच नाही तर खतरों के खिलाडी 10 मध्येही ती झळकणार आहे.

Visit : Policenama.com