OMG ! एकाच मुलासोबत लग्न करण्यासाठी आडून बसल्या दोन मुली, मग टॉस उडवून निवडली वधू!

बेंगळुरु : वृत्तसंस्था –  OMG | लग्नापूर्वी घरच्यांची परवानगी आणि मुलगा-मुलीची सहमती आवश्यक असते. परंतु कर्नाटकमध्ये टॉसद्वारे एक लग्न ठरवण्यात आले. घटना कर्नाटकच्या अलूर तालुक्यातील एका गावातील आहे, येथे एका तरूणाचे दोन मुलींसोबत अफेयर सुरू असल्याने लग्नात मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. लग्नाच्या काहीवेळ अगोदर दोन्ही मुली पोहचल्या आणि आपआपल्या मागणीवर आडून बसल्या. अखेर गाववाल्यांनी या समस्येवर तोडगा (OMG) काढण्यासाठी टॉस उडवण्याचा निर्णय घेतला.

दोन्ही तरूणी जिद्दीला पेटल्या

दोन्ही तरूणी या गोष्टीवर आडून बसल्या की जर तरूणाचे लग्न होईल तर केवळ माझ्याशीच.
गाववाल्यांनी खुप समजवण्याचा प्रयत्न केला परंतु दोघींपैकी कोणीही माघार घेण्यास तयार नव्हते.

इतके की एका तरूणीने आत्महत्येचा सुद्धा प्रयत्न केला.
अखेर गाववाले पुन्हा एकदा जमले आणि या निर्णयावर आले की, वर कुणाचा याचा निर्णय टॉसने होईल.

तरूणाला लगावली कानशिलात

टॉसच्या अगोदर ही सुद्धा अट ठेवण्यात आली की, अगोदर एका बाँड पेपरवर तिघांना सही करावी लागेल आणि जो निर्णय होईल तो मान्य करावा लागेल.
सर्व प्रक्रियेनंतर जेव्हा टॉस उडवण्यात आला तेव्हा आतापर्यंत शांत असलेल्या तरूणाने आपली इच्छा जाहीर केली.

ज्या तरूणीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता तिला तरूणाने मिठीत घेतले.
हे पाहून दुसर्‍या तरूणीचा संताप अनावर झाला आणि तिने तरूणाला एक जोरदार कानशिलात लगावली. यासोबतच निर्णय झाला की, तरूण कुणासोबत लग्न करणार, आणि टॉस उडवण्याची पाळीसुद्धा आली नाही.

 

Web Title : OMG | marriage decided by toss in karnataka over two girls dispute

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यातील नायडू हॉस्पीटलमधील महिला डॉक्टरचा तलाठी पतीकडून खून

Mukesh Ambani | RIL, Jio च्या मुकेश अंबानी यांचा नवा ‘विक्रम’ ! बनले पहिले भारतीय, ज्यांची संपत्ती 100 अरब डॉलरच्या पुढे

Narayan Rane | केंद्रीय मंत्री राणेंच्या वाहनावरील चालकाचा मृत्यू, कुटुंबियांनी केला गंभीर आरोप