अबब ! मोदींच्या परदेशवारीचा खर्च …..

नवी दिल्ली: वृत्तसंस्था

मंत्र्याच्या परदेश दौऱ्याच्या खर्चाचा विचार सर्वसामान्यांनी न केलेलाच बरा … पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्याबद्दल विरोधकांकडून वारंवार टीका केली जाते. गेल्या चार वर्षात मोदी यांनी जवळपास संपूर्ण जगाची भ्रमंती केली आहे. या जगभ्रमंतीत आतापर्यंत जवळपास दीड हजार कोटींचा खर्च आला आहे. आज मोदी आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत ते तेथील रवांडा आणि युगांडा या दोन देशाना भेटी देणार आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , मोदींनी आतापर्यत चार वर्षात ५४ देशांचा दौरा केला आहे. या दौऱ्यादरम्यान एकूण १,४८४ कोटी रुपये खर्च झाले आहेत. ते चार वर्षात १७१ दिवस परदेशात राहिले आहेत. त्यामुळे पंतप्रधान म्हणून सुमारे १२ टक्के वेळ त्यांनी परदेशात घालविला आहे. विशेष म्हणजे, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ९ वर्षे पंतप्रधान होते. या ९ वर्षाच्या काळात मनमोहन सिंग यांच्या परदेशवारीवर फक्त ६४२ कोटी रुपये खर्च झाला होता. त्यामुळे मोदी परदेशवारी करणारे आजवरचे सर्वात खर्चिक पंतप्रधान ठरेल आहेत.

[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5d28a639-8e46-11e8-baca-5f396bb02c5e’]

एप्रिल २००५ मध्ये मोदी फ्रान्स ,जर्मनी आणि कॅनडाच्या दौऱ्यावर होते. त्यांचा हा दौरा आजवरचा सर्वात महागडा दौरा ठरला आहे. या दौऱ्यातील त्यांच्या केवळ चार्टड फ्लाइट आणि हॉटलाइन सुविधेवर ३२ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

मोदींनी सर्वाधिक वेळा अमेरिकेचा दौरा केला आहे. जुलै ते नोव्हेंबर या काळात त्यांनी सर्वाधिक परदेशवारी केली आहे. याच काळात  ब्रिक्स  आणि ईस्ट एशिया समिट असते . मोदींनी त्यांच्या दौऱ्यासाठी आतापर्यंत पाच वेळा इंडियन एअरफोर्सच्या एअरक्राफ्टचा वापर केला आहे.

जाहिरात