OMG ! ब्लॅक कारमध्ये ‘हे’ करताना दिसून आले सारा आणि कार्तिक, Photos Viral

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कार्तिक आर्यन प्रति सारा अली खानला किती प्रेम वाटतं हे सर्वांना माहीतच आहे. दोघेही बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार आहे. सारा अनेकदा खुले आम कार्तिकवर जीव ओवाळताना दिसून येते.

कार्तिकही सारासोबत अनेक वेळा स्पॉट झाला आहे. सध्या त्या दोघांचेही काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोवरून प्रेक्षकांनीही भरभरून मीम्स बनवले आहेत. या फोटोंमध्ये कार्तिक आणि सारा खूपच जवळ आल्याचे दिसत आहे.

https://www.instagram.com/p/BvbC50iHs8U/?utm_source=ig_embed

फोटोमध्ये दिसत आहे की, कार्तिकने साराच्या गळ्यात मागून हात टाकला आहे. सध्या हा फोटो खूप व्हायरल होत असून सोशलवर या फोटोला पसंती मिळताना दिसत आहे. याआधी सारा बिना हेल्मेटची कार्तिक सोबत दिसून आली होती. त्यावेळी त्यांना प्रेक्षकांनी चांगलेच ट्रोल केले होते. सध्या सारा आणि कार्तिक दोघेही लव आजकल पार्ट 2 च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.

सारा अली खानने करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये सांगितले होते की कार्तिक तिचा क्रश आहे. यानंतर कार्तिक आणि सारा अनेक इव्हेंटमध्ये एकत्र दिसून आले होते. बॉलिवूड रिपोर्ट्सनुसार, लव आजकल 2 या सिनेमाच्या निमित्ताने दोघांमधील जवळीक खूपच वाढत आहे.