संपत्ती पाहून डोळे फिरतील ! नोटांच्या थप्प्या अन् 5 किलो सोनं-चांदी, TDP च्या नेत्यावर CBI चा छापा

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सीबीआयनं आप्को (स्टेट हँडलूम वीवर्स कोऑपरेटीव्ह सोसायटी) चे माजी अध्यक्ष आणि तेलगू देसम पक्षाचे नेते गुज्जल श्रीनिवासुलू यांच्या घरी आणि ऑफिसमध्ये शुक्रवारी छापा टाकला. यावेळी सीबीआयच्या हाती कोट्यावधी रुपयांची संपत्ती लागली आहे.

गुज्जल श्रीनिवासुलू यांच्या खाजीपेठ येथील घरी आणि कार्यालयावर हा छापा टाकण्यात आला होता. यावेळी 3 किलो सोनं, 2 किलो चांदी, 1 कोटींपेक्षा जास्त रोख रक्कम आणि मालमत्तेची काही कागदपत्रं जप्त करण्यात आली. याशिवाय त्यांच्या हैदराबाद येथील घरातून 10 लाख रुपयांच्या जुन्या नोटाही जप्त करण्यात आल्या. याशिवाय यात 10 लाख रुपयांच्या नव्या नोटादेखील हाती लागल्या आहेत.

जे 3 किलो सोनं या छाप्यात हाती लागलं आहे त्यात कोट्यावधी रुपयांच्या किमतीचे दागिने आणि हार जप्त करण्यात आले आहेत. सध्या सीबीआयनं ही सर्व संपत्ती जप्त केली आहे. याशिवाय कोट्यावधी रुपयांच्या सोनाच्या, रत्नजडीत बांगड्याही जप्त करण्यात आल्या आहेत.

आंध्र प्रदेशातील अनंतपूरच्या कोषागार विभागाच्या कर्मचाऱ्याकडे ट्रंकच्या ट्रंक भरून सोन्या चांदीचे दागिने, भांडी सापडली होती. ही सर्व स्थिती पाहता छाप्यासाठी गेलेल्या पोलिसांचेही डोळे विस्फारले होते. काही दिवसांपूर्वीच हैदराबादमध्ये एका तहसीलदाराच्या घरात घबाड सापडलं होतं. त्या तहसीलदारालाही या कर्मचाऱ्यानं मागं टाकलं होतं.

पोलिसांनी जेव्हा छापा टाकला तेव्हा या खजिनदाराच्या घरात मोठं मोठे ट्रंक सापडले. यात सोने, चांदी, आणि रोख रक्कत सापडली. हे सर्व काळं धन 8 मोठ्या ट्रंकमध्ये लपवून ठेवलं होतं. पोलिसांनी जेव्हा एवढी सारी संपत्ती पाहिली तेव्हा त्यांचे डोळेच विस्फारले. अखेर हे सोनं चांदी मोजण्यासाठी एका मोठ्या ज्वेलरकडून त्यांना मशीनचं मागवावी लागली होती. डीएसपींनी याबाबत बोलताना सांगितलं की, “मनोज कुमारकडे 2.42 किलो सोनं, 84.10 किलो चांदी आणि 15.55 लाखांची रोख रक्कम सापडली आहे. याशिवाय त्याच्या नावावर 48 लाखांचं फिक्स डिपॉझिट, 27.05 लाखांचे बाँड देखील सापडले आहेत.”