OMG ! ’ते स्वप्नात आले आणि म्हणाले – ‘मंदिर बांध’, लाखो रूपये खर्च करून आता महिलेने बांधले पतीचे मंदिर’

विशाखापट्टनम : OMG ! आंध्र प्रदेशातील पोडिली मंडलमधील निम्मावरम गावातील एका महिलेने मरणोत्तर आपल्या पतीचे मंदिर बनवले आहे. ज्यामध्ये पतीची मूर्तीसुद्धा स्थापन केली आहे. सोशल मीडियावर आता या मंदिराची छायाचित्रे वायरल होत आहेत, यूजर्स यावर विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. ऐकून आश्चर्य वाटेल की हे मंदिर (OMG) बांधण्यामागील कारण, नवर्‍याचे प्रेम नसून दुसरेच आहे.

मंदिर बांधण्याचे कारण विचारले असता महिला म्हणाली, पती माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मंदिर बांधण्यास सांगितले. इतकेच नव्हे ही महिला मंदिरात दररोज आपल्या पतीची आरती आणि पूजा करते.

महिलेचे नाव पद्मावती असून तिचा पती प्रकाशम अंकिरेड्डी यांचे 4 वर्षापूर्वी अपघातात निधन झाले होते, ज्यानंतर पद्मावती यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या.

दरवर्षी पद्मावती करतात भंडारा

पद्मावती यांनी पतीची इच्छा पूर्ण करत बांधलेल्या मंदिरात पती प्रकाशम यांची संगमरवरी मूर्ती
स्थापन केली आहे. दरवर्षी लोकांना बोलावून येथे भंडार्‍याचे आयोजन करण्यात येते. तसेच पतीच्या
वाढदिवसासह काही प्रसंगी पूजा आणि अभिषेक केला जातो. पद्मावतीच्या मुलाचे म्हणणे आहे की
तो स्वताला नशीबवान समजातो की त्याला आंकिरेड्डी सारखे पिता आणि अशी आई मिळाली.

पद्मावती एका पुराणमतवादी कुटुंबातून येते. त्यांनी लहानपणापासूनच आपल्या आईला वडिलांची पूजा करताना पाहिले होते. या कारणामुळे सुद्धा त्यांनी पतीचे मंदिर बनवून आपले प्रेम व्यक्त केले.

हे देखील वाचा

OMG ! अचानक 8 महिन्यांची ’गरोदर’ झाली मुलगी ! डॉक्टरांना पोटात वाढताना दिसला साक्षात 13 किलोचा मृत्यू

Murder in Pimpri | अनैतिक संबंधातून एकाचा खून, महिला आरोपीला अटक

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  omg ! woman from andhra pradesh built a temple in her husband name said he had come in a dream

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update