Omicron Covid Variant | गेल्या 24 तासात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 190 नवीन रुग्ण ! राज्यात 450 पैकी 125 रुग्णांनी ओमिक्रॉनवर मात, जाणून घ्या आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधितांची (Coronavirus in Maharashtra) संख्या वाढत असताने ओमिक्रॉन व्हेरियंटने (Omicron Covid Variant) चिंता वाढवली आहे. दररोज ओमिक्रॉनबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. राज्यातील ओमिक्रॉन बाधित (Omicron Covid Variant) रुग्णांची संख्या 450 वर गेली असून देशात महाराष्ट्रात सर्वाधिक ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात मुंबईत (Mumbai) सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज (गुरुवार) राज्यात 198 नवीन ओमिक्रॉन बाधित (Omicron Covid Variant) रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तब्बल 190 रुग्ण हे मुंबईतील आहेत. तर 4 रुग्ण ठाण्यातील (Thane) आहेत. सातारा (Satara), नांदेड (Nanded), पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) आज प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. बुधवारी राज्यात 85 नवीन ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले होते. तर आज यामध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे.
राज्यात आजपर्यंत 450 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक मुंबईत आहेत. मुंबईतील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 327 इतकी झाली आहे. दिलासादयक बाब म्हणजे राज्यात 450 पैकी 125 रुग्णांनी ओमिक्रॉनवर मात केली आहे.
Maharashtra reports 5,368 fresh COVID cases (a jump of 1,468 over yesterday's numbers), 1,193 recoveries, and 22 deaths today, taking active cases to 18,217
The number of #Omicron cases rises to 450, with the state recording 198 cases of the variant today pic.twitter.com/UJLyPfq1Fs
— ANI (@ANI) December 30, 2021
राज्यातील ओमिक्रॉन रुग्ण
मुंबई – 327
पिंपरी -चिंचवड – 26
पुणे ग्रामीण (Pune Rural) – 18
पुणे शहर (Pune City) – 12
ठाणे -12
नवी मुंबई (Navi Mumbai) – 7
पनवेल (Panvel) -7
कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivali) -7
नागपूर (Nagpur) – 6
सातारा – 6
उस्मानाबाद (Osmanabad) – 5
वसई-विरार (Vasai-Virar) – 3
नांदेड -3
औरंगाबाद (Aurangabad) – 2
बुलढाणा (Buldhana) – 2
भिवंडी (Bhiwandi) – 2
अहमदनगर (Ahmednagar), अकोला (Akola), कोल्हापूर (Kolhapur) आणि मीरा भाईंदर (Mira Bhayander) – प्रत्येकी 1
Web Title :- Omicron Covid Variant | 190 new patients of Omicron variant in last 24 hours! 125 out of 450 patients in the state overcome Omicron, know the statistics
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update