Omicron Covid Variant | राज्यात आज ओमायक्रॉनचे 23 नवे रुग्ण ! पुण्यात सर्वाधिक13, मुंबईत 5, उस्मानाबादमध्ये 2, ठाणे तसेच नागपूर आणि मिरा भाईंदरमध्ये प्रत्येकी 1 नवीन रुग्ण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा (Coronavirus in Maharashtra) प्रादुर्भाव कमी होत असतानाच ओमायक्रॉनचे रुग्ण (Omicron Covid Variant) आढळून येत आहे. आज (गुरुवार) दिवसभरात राज्यात तब्बल 23 ओमायक्रॉनचे रुग्ण (Omicron Covid Variant) आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात (Pune district) आढळून आले आहे. राज्यात आतापर्यंत 88 ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी 42 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.

आज राज्यात आढळून आलेल्या 23 ओमायक्रॉन बाधित (Omicron Covid Variant) रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळून आले आहेत. पुणे जिल्ह्यात 13, मुंबई (Mumbai)-5, उस्मानाबाद (Osmanabad)-2, ठाणे (Thane)-1, नागपूर (Nagpur) -1, मिरा भाईंदर (Mira Bhayander) 1 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत असताना जीवघेण्या ओमायक्रॉनचा देखील प्रादुर्भाव वाढत आहे.

 

पिंपरी चिंचवडमध्ये 7 रुग्ण
पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) महानगरपालिकेच्या वतीने परदेशामधून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. आज (गुरुवार) ओमायक्रॉन चे 7 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 4 पुरुष आणि 2 महिलांचा आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. यापैकी 4 रुग्णांवर नवी भोसरी रुग्णालयात तर 3 जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांचा प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

 

Web Title :- Omicron Covid Variant | 23 new Omicron patients in the maharashtra today! 13 in Pune, 5 in Mumbai, 2 in Osmanabad, 1 each in Thane, Nagpur and Mira Bhayander

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Honda Activa | फक्त 9 हजारांमध्ये आता मिळेल 60 kmpl मायलेजची देशातील बेस्ट सेलिंग Honda Activa ची प्रीमियम एडिशन

Prahlad Singh Patel | शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योगाला मोठी पावले उचलावी लागतील – प्रल्हाद पटेल

LIC Jeevan Shiromani Plan | केवळ चार वर्षांच्या गुंतवणुकीवर मिळेल 1 कोटीची रक्कम ! LIC च्या शानदार प्लानमध्ये करू शकता गुंतवणूक

Wheatgrass-Reduce Uric Acid Levels | यूरिक अ‍ॅसिडचा स्तर कमी करण्यासाठी मदत करू शकते व्हीटग्रास, वेटलॉसमध्ये सुद्धा लाभदायक

Earn Money From Home | फक्त 50,000 रुपयांत सुरू करा ‘हा’ व्यवसाय आणि कमवा 5 लाखाहून जास्त रुपये, सरकार देणार 40% सबसिडी

PM Kisan Sanman Nidhi Yojana | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 1 जानेवारीलाच मोदी सरकारकडून भेट; 4 हजार रुपये थेट खात्यातपाठवणार, जाणून घ्या

Pune Crime | अल्पवयीन मुलावरील अनैसर्गिक अत्याचाराचा उलगडा; मोबाईलमधील अश्लील क्लिपनं गुन्ह्याची उकल, पुण्यातील घटना