Omicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा NIV कडून रिपोर्ट आला, ओमिक्रॉन नाही तर आढळला कोरोनाचा ‘हा’ व्हेरिएंट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या (Corona) ओमिक्रॉन (Omicron Covid Variant) या नव्या घात व्हेरिएंटबाबत जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. देशातील कर्नाटक (Karnataka) आणि गुजरात (Gujarat) या राज्यापाठोपाठ ओमक्रॉनने महाराष्ट्रात (Maharashtra) एन्ट्री केली आहे. दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे 24 नोव्हेंबरला मुंबईमध्ये आलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट (Omicron Covid Variant) सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. याच दरम्यान झांबिया (Zambia) देशातून पुण्यात (Pune) आलेल्या 60 वर्षीय पुरुषाच्या जनुकीय तापसणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून (National Institute of Virology) प्राप्त झाला आहे.

 

झांबिया देशातून पुण्यात आलेल्या 60 वर्षीय रुग्णामध्ये ओमिक्रॉन हा व्हेरिएंट (Omicron Covid Variant) आढळलेला नाही, तर या रुग्णामध्ये ‘डेल्टा सबलिनिएज विषाणू’ (Delta Subliniase Virus) आढळून आला आहे. शनिवारी (दि.4) सकाळपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) अति जोखमीच्या देशातून आलेल्या सर्व 3839 प्रवाशांची आरटीपीसीआर (RTPCR) तपासणी करण्यात आली आहे. तसेच इतर देशांमधून आलेल्या प्रवाशांचीही आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे.

शासनाचे नागरिकांना आवाहन
विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून याबाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपलं लसीकरण पूर्ण करावं आणि मागील महिन्याभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करुन भारतात आले आहेत त्यांनीही आपल्याबद्दल स्थानिक आरोग्य विभागास माहिती द्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

 

Web Title :- Omicron Covid Variant | a different corona variant was found in the report of a 60 year old man from abroad in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Thane Crime | धक्कादायक ! 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला म्हणून केलं तिच्या पोरीशी लग्न; नंतर 27 वर्षांच्या जावयाकडून सासूवर बलात्कार

Electricity Mobility Promotion Policy | गाडी खरेदी करणार्‍यांसाठी खुशखबर ! ‘हे’ सरकार देतंय 3 लाखापर्यंत सबसिडी, जाणून घ्या

Income Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या ‘हे’ काम, अन्यथा 1 जानेवारीनंतर द्यावी लागेल ‘पेनल्टी’

Pune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत; व्याजाचे पैसे न दिल्याने केला होता खून

ACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांची विश्रामबाग डिव्हीजनमध्ये नियुक्ती

ACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची गुन्हे शाखेत नियुक्ती