Omicron Covid Variant | चिंताजनक ! पुण्यानंतर जयपूरमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – डोंबिवलीत ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आल्यानंतर आज पुण्यात ओमायक्रोन व्हेरियंटने (Omicron Covid Variant) एन्ट्री केली आहे. पुणे शहरातील (Pune) एका आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) मधील सहा जणांना ओमायक्रॉन विषाणूचा (Omicron Covid Variant) संसर्ग झाला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये नायजेरियातून (Nigeria) आलेल्या सदस्यांमुळे एकाच कुटुंबातील सहा जणांना ओमायक्रॉन या कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचे वृत्त येत नाही तोच राजस्थानमध्ये (Rajasthan) असाच प्रकार घडला आहे.

 

राजस्थानमध्ये साऊथ आफ्रिकेतून (South Africa) आलेल्या एका कुटुंबामुळे 9 जणांना कोरोनाची लागण (Corona infection) झाली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ओमायक्रॉनचे (Omicron Covid Variant) रुग्ण सापडल्याने देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली आहे. काल डोंबिवलीत रुग्ण सापडल्यानंतर आज पुण्यात सात रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महाराष्ट्रातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 8 झाली आहे. तर देशातील एकूण रुग्णांचा आकडा 21 वर पोहचला आहे.

 

राजस्थानच्या जयपूरमध्ये ओमायक्रॉनचे 9 रुग्ण सापडले. एक दाम्पत्य दोन मुलांसह दक्षिण आफ्रिकेतून जयपूरच्या आदर्श नगरमध्ये आले होते. त्यांना कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची बाधा झाली होती. त्यांच्यामुळे कुटुंबातील जयपूरमध्ये राहणाऱ्या इतर पाच जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. हे दाम्पत्य 25 नोव्हेंबर रोजी भारतात आले होते.

 

पुण्यात कसे वाढले रुग्ण?

24 नोव्हेंबरला नायजेरिया देशातून आलेले 44 वर्षाची महिला आणि तिच्या सोबत आलेल्या दोन मुली तसेच पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन मुली असे एकूण सहा जणांचे नमुने ओमायक्रॉन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू संस्थेने (National Institute of Virology) आज सायंकाळी त्यांचा अहवाल दिला आहे. यामध्ये यामध्ये सहाही जण ओमायक्रॉन बाधित सापडले आहेत.

 

Web Title :- Omicron Covid Variant | after pune 9 members same family jaipur were infected omicron covid variant

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Jacqueline Fernandez | 200 कोटीचे खंडणी प्रकरण! अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मुंबई विमानतळावर देशाबाहेर जाण्यापासून रोखले

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 707 नवीन रुग्ण, ‘ओमायक्रॉन’च्या रूग्ण संख्येत वाढ; जाणून घ्या इतर आकडेवारी

DGP Sanjay Pandey | परमबीर सिंह हे व्हिक्टिम कार्ड खेळत आहेत, DGP संजय पांडेंचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर

Rupali Chakankar | …तर सरपंचपद धोक्यात येणार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची सरकारकडे शिफारस