Homeताज्या बातम्याOmicron Covid Variant | दोन्ही डोस घेतल्यानंतरही 'कोरोना'ची लागण झालीय तर बूस्टर...

Omicron Covid Variant | दोन्ही डोस घेतल्यानंतरही ‘कोरोना’ची लागण झालीय तर बूस्टर डोसबद्दल केंद्र सरकारने निर्णय घ्यावा – अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Omicron Covid Variant | कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असतानाच कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन विषाणूमुळे (Omicron Covid Variant) सर्वत्र पुन्हा संकट ओढवले आहे. जगातील अनेक देशांसह भारतातही काही निर्बंध लावण्यात आले आहे. सध्या महाराष्ट्रात आठ तर देशात ओमायक्रॉनचे २१ रुग्ण आढळून आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे ओमायक्रॉनच्या संसर्गाचे प्रमाण डेल्टापेक्षा अधिक आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंद्र सरकारनेच कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस (Booster Dose) घ्यायचा की नाही यावर निर्णय घ्यावा असे सांगितले.

 

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din) दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन अजित पवार यांनी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, समता, एकता, बंधुता, सर्वधर्मसमभाव या विचारांनीच देश पुढे जाऊ शकतो. त्यामुळे या विचारानेच देशाला पुढे न्यायचे आहे.

 

बुस्टर डोस बाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. सध्या तर ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांनाच याची बाधा झाल्याचे समोर आले आहे. असे असेल तर मग बुस्टर डोसची गरज आहे का?, आपल्याकडे डोस उपलब्ध असून त्यावर देशपातळीवर निर्णय झाला पाहिजे असे वाटते. तसेच डोस द्यायचा की नाही यावर त्यासंबंधीचे तज्ञ लोकच सांगू शकतील. राज्यातील परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. देशातील राज्यांमध्ये बाहेर चे जे रुग्ण येतात त्याबाबत केंद्र सरकारनेही कठोर भूमिका घेतली पाहिजे. देशात जिथे जिथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

 

 

तेथे काटेकोरपणे नियमांचे पालन होते की नाही हे देखील पाहणे गरजेचे आहे.
राजकीय लोकांच्या घरातील लग्न काल परवा झाले.
लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
आपण यापूर्वी पाच ते सहा फुटांचे अतंर ठेवत होतो. मास्क काढला तरी संसर्ग होत होता.
आता ओमायक्रॉनचे (Omicron Covid Variant) संकट आले आहे.
त्यावर देशपातळीवर निर्णय घेण्याची गरज आहे.
केंद्र सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेने लहान मुलांच्या लसीकरणाबद्दल भूमिका स्पष्ट करण्याची गरज असल्याचे अजित पवार यांनी म्हंटले आहे.

 

Web Title :- Omicron Covid Variant | ajit-pawar reaction over coronavirus omicron variant and booster dose vaccination omicron covid variant

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News