Omicron Covid Variant | महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार? आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा नवीन विषाणू ओमिक्रॉनचा (Omicron Covid Variant) संसर्ग वाढण्याची भीती आणि महाराष्ट्रात पुन्हा कडक निर्बंध (Strict restrictions) लावण्यासंदर्भात नागरिकांमध्ये चिंता आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ओमिक्रॉन विषाणूच्या (Omicron Covid Variant) संसर्गाची तीव्रता अत्यंत कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे सांगतानाच महाराष्ट्रात कठोर निर्बंध लावण्याबाबत कोणताही विचार सध्या तरी नाही असे राजेश टोपे यांनी सांगितले.

 

‘थ्री टी’ फॉर्म्युल्यावर भर
ओमिक्रॉन विषाणूचा (Omicron Covid Variant) संसर्ग झालेले रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. राज्यात पुन्हा कठोर निर्बंध किंवा लॉकडाऊन (Lockdown) लागणार का, याबाबत त्यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी लॉकडाऊनबाबत कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले. ‘थ्री टी’ फॉर्म्युला म्हणजे टेस्टिंग (Testing), ट्रॅकिंग (Tracking) आणि ट्रीटमेंट (Treatment) यावर अधिक भर दिला जात आहे. कोविडसंबंधी नियमांची अंमलबजावणी यावर अधिक भर दिला जात असल्याचे टोपे यांनी सांगितले.

विषाणूची संसर्ग क्षमता अधिक, मात्र…
महाराष्ट्रात आतापर्यंत नव्या विषाणूचा संसर्ग झालेले 10 रुग्ण आढळून आले आहेत. तर 65 नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी (Genome sequencing) पाठवण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळांवर (International Airport) स्क्रीनिंग वाढवण्यात आली आहे. ओमिक्रॉनचा फैलाव जवळपास जगभरातील 54 देशांमध्ये झालेला दिसून येत आहे. विषाणूची संसर्ग क्षमता अधिक आहे. मात्र त्याची तीव्रता अत्यंत कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे टोपे यांनी सांगितले.

 

लॉकडाऊनचा विचार नाही
राज्यात कठोर निर्बंध अथवा लॉकडाऊन लावण्यासंदर्भात कोणताही विचार नाही.
राज्याच्या टास्क फोर्सकडून (Task Force) अद्याप तशा काही सूचनाही आलेल्या नाहीत.
आम्ही परिस्थिवर अत्यंत बारीक नजर ठेवून आहोत. केंद्र सरकार (Central Government),
टास्क फोर्स आणि मुख्यमंत्र्यांकडून (CM) आलेल्या सूचनांनंतर त्यावर निर्णय घेतला जाईल असे टोपे यांनी सांगितेल.

 

Web Title :- Omicron Covid Variant | amid the omicron scare we are not thinking about any lockdown in maharashtra as of now rajesh tope

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक प्रकार ! ‘YouTube’ पाहून इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यानं बनावट पेमेंट अ‍ॅपद्वारे 25 सराफांना घातला गंडा

EDLI | खुशखबर ! नोकरी करणार्‍यांना मोफत मिळेल पूर्ण 7 लाखाचा फायदा, जाणून घ्या – काय आहे पद्धत?

Pankaja Munde | गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र; 12 डिसेंबरला नवा संकल्प कराल का?