Omicron Covid Variant | नववर्षाच्या स्वागत कार्यक्रमांवर ओमिक्रॉन व्हेरियंटचे सावट ! मुंबई महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा (Coronavirus in Maharashtra) धोका वाढत असताना ओमिक्रॉन व्हेरियंटचे (Omicron Covid Variant) रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. ओमिक्रॉन व्हेरियंटचा (Omicron Covid Variant) वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra Government) रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदीचे (Curfew) आदेश जारी केले आहेत. त्यानंतर आता मुंबई महापालिकेने (BMC) मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत नववर्षाच्या स्वागत समारंभाचे (New Year Celebration) आयोजन करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटचे सावट असल्याने 31 डिसेंबर सेलिब्रेशनला (31st Celebration) बंदी घालण्यात आली आहे. याबाबत मुंबई महापालिकेकडून आदेश जारी करण्यात आले आहेत.

राज्यात कोविड रुग्णांची संख्या 1410 वर पोहोचली आहे. तसेच मुंबई शहर आणि उपनगरात कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटचे (Omicron Covid Variant) रुग्णही सापडत आहेत. त्यामुळे बीएमसीने (BMC) नवीन वर्षाच्या सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा नवीन वर्षाचे स्वागत घरातूनच करावे लागणार आहे..

मुंबई महापालिकेने 31 डिसेंबरचे कार्यक्रम बंदीस्त आणि खुल्या जागेत साजरे करण्यास आणि नववर्षाच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यासही निर्बंध घातले आहेत. गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India), जूहू बीच (Juhu Beach), मोठे हॉटेल्स (hotels) आणि सार्वजनिक ठिकाणीही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. मात्र, ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण वाढत असल्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात ओमिक्रॉन व्हेरियंटचे 108 रुग्ण आहेत.

Web Title : Omicron Covid Variant | Covid 19 all new year gatherings banned in mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा