Omicron Covid Variant In Maharashtra | राज्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढला; रुग्ण संख्या पोहोचली 17 वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने (Omicron Covid Variant In Maharashtra) शिरकाव केल्यानंतर एकीकडे रुग्ण बरे होत आहेत तर दुसरीकडे ओमायक्रॉन (Omicron Covid Variant In Maharashtra) रुग्णांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. मुंबईमध्ये ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 5 वर पोहोचली आहे. याआधी मुंबईत दोन रुग्ण आढळले होते. महाराष्ट्रात (Maharashtra) रुग्णांची संख्या ही 17 वर पोहचली आहे.

 

बृहन्मुंबई महानगर पालिका क्षेत्रात 3 रुग्णांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 5 वर पोहोचली आहे. या रुग्णांना कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित रुग्णाला तातडीने महापालिकेच्या रुग्णालयातील विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

राज्यात ओमायक्रॉनचे 17 रुग्ण
राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे 17 रुग्ण आहेत. मुंबईमध्ये 3 रुग्ण आढळले आहेत तर पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) 4 रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबईतील तिन्ही रुग्ण हे परदेशातून आलेले आहेत. या 7 रुग्णांपैकी चार जाणांनी कोरोनाची लस घेतलेली होती. तर एका व्यक्तीने एकच डोस घेतला होता. धक्कादायक म्हणजे या सात जणांमध्ये 3.5 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.

 

धारावीत ओमायक्रॉनचा रुग्ण
कोरोनाचा नवीन व्हेरिएंट (Corona new variant) ओमायक्रॉन मुंबईत हातपाय पसरत आहे.
मुंबईची सर्वात गजबजलेली झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये (Dharavi slum) ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आला आहे.
परदेशातून आलेल्या एका मौलवीचा (maulavi) ओमायक्रॉन (Omicron Covid Variant In Maharashtra) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
त्यामुळे मुंबईतील (Mumbai) आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून रुग्णाला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

 

Web Title :- Omicron Covid Variant In Maharashtra | omicron increased in maharashtra number of patients increased to 17

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

BMC Mayor Kishori Pednekar | BMC च्या महापौर किशोरी पेडणेकरांना पत्र लिहिणारा निघाला वकील; अश्लिल भाषेत दिली होती धमकी

PPF Account मुलांपासून मोठ्यांच्या नावाने उघडता येते, NSC पेक्षा मिळते जास्त व्याज; RD पेक्षा सुद्धा याबाबतीत चांगले

Mumbai NCB | NCB ने अटक केलेल्या आरोपीचा कारागृहात मृत्यू; प्रचंड खळबळ