Omicron Covid Variant | नायजेरियाहून पुण्यात आलेल्या ओमिक्रॉन बाधित रुग्णाचा मृत्यू, पण मृत्यूमागील कारण वेगळं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना ओमिक्रॉन व्हेरिएंटने (Omicron Covid Variant) चिंता वाढवली आहे. मागील काही दिवसांपासून ओमिक्रॉन बाधित (Omicron Covid Variant) रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आज (गुरुवार) राज्यात 198 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी एका रुग्णाच्या मृत्यूची (Death) देखील नोंद झाली आहे. पुण्यातील (Pune) पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. परंतु या रुग्णाचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) झाला आहे. त्याचा NIV रिपोर्ट आज आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील आज तीन रुग्णांचा एनआयव्ही रिपोर्ट (NIV Report) समोर आला आहे. यामध्ये तीन जणांना ओमिक्रॉनची (Omicron Covid Variant) बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी एकजण हा नायजेरिया (Nigeria) येथून आला आहे. तर उर्वरित दोन जण त्याचे निकटवर्तीय आहेत. नायजेरिया येथून आलेल्या रुग्णाचा वायसीएम (YCM Hospital) येथील रुबी एल केअर कार्डीयाक सेंटर (Ruby Care Cardiac Center) येथे 28 डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मात्र त्याचा ओमिक्रॉनचा अहवाल आज आला आहे. या रुग्णाची ओमिक्रॉनची लागण प्रासंगिक निदान असल्याचे महापालिकेने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज (गुरुवार) राज्यात 198 नवीन ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
त्यापैकी तब्बल 190 रुग्ण हे मुंबईतील आहेत. तर 4 रुग्ण ठाण्यातील (Thane) आहेत. सातारा (Satara), नांदेड (Nanded),
पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) आज प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे.
बुधवारी राज्यात 85 नवीन ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले होते. तर आज यामध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे.
राज्यात आजपर्यंत 450 रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादयक बाब म्हणजे राज्यात 450 पैकी 125 रुग्णांनी ओमिक्रॉनवर मात केली आहे.

 

 

Web Title :- Omicron Covid Variant | in pimpri chinchwad 52 year old death man came from nigeria nia report says tested omicron positive pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mayor Murlidhar Mohol | 15 ते 18 वयोगटासाठी पुणे शहरात 5 लसीकरण केंद्रे, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

 

Coronavirus in Mumbai | मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाची धक्कादायक आकडेवारी; Mumbai लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?

 

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक! राज्यात ‘कोरोना’ रुग्णसंख्येत मोठी वाढ, गेल्या 24 तासात 5368 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी