Omicron Covid Variant in Pune | चिंताजनक ! पुण्यात ‘ओमायक्रॉन’चा शिरकाव; पिंपरी-चिंचवडमध्ये 6 तर पुण्यातील एका रूग्णाला Omicron ची लागण (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Omicron Covid Variant in Pune महाराष्ट्रातील पहिला ओमायक्रॉनचा (Omicron Variant) रुग्ण डोबिवलीत सापडला असताना आता ओमायक्रॉनची पुण्यात एन्ट्री झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) 6 तर पुण्यात एका रुग्णाला ओमायक्रॉन विषाणूचा (Omicron Variant) संसर्ग झाल्याचे सिद्ध झाले आहे. नॅशनल केमिकल लॅबोरटरीचा (National Chemical Laboratory) अहवाल आज प्राप्त झाला असून यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये नायजेरिया (Nigeria) देशातील लेगॉस शहरातून आलेल्यांना नव्या व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे. तर फिनलंड येथून पुण्यात आलेल्या व्यक्तीला ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे. (Omicron Covid Variant in Pune)

 

नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी 24 नोव्हेंबर रोजी आलेल्या 44 वर्षीय महिला, तिच्या सोबत असलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली असे एकूण 6 जणांचा प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषाणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (National Institute of Virology) आज (रविवार) संध्याकाळी दिला आहे. तसेच पुणे शहरातील 47 वर्षीय पुरुषाला देखील या नवीन व्हेरियंटचा संसर्ग झाल्यााचा नॅशनल केमिकल लॅबोरटरीच्या अहवालावरुन सिद्ध झाले आहे. (Omicron Covid Variant in Pune)

 

 

 

पिंपरीत सापडलेल्या ओमायक्रॉन रुग्णांपैकी 3 जण नायजेरियाहून आले आहेत तर इतर तिघे त्यांच्या निकटसहवासातील आहेत. नाजेरियातून आलेल्या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या 13 जणांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये महिलेचा 45 वर्षाचा भाऊ आणि त्याची दीड आणि 7 वर्षाच्या दोन मुली कोविड बाधित आल्या होत्या. या तिघांचा ओमायक्रॉन विषाणूचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सर्वांवर पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

 

 

पुणे शहरातील ओमायक्रॉन बाधित रुग्ण नेहमीच्या सर्वेक्षणात आढळून आला आहे. हा रुग्ण 18 ते 25 नोव्हेबंर या काळात फिनलंड येथे गेला होता. 29 तारखेला थोडासा ताप आला म्हणून त्याने चाचणी केली असता तो कोविड बाधित आढळून आला. त्याने कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतले असून सध्या त्यांना कोणतीही लक्षणे नसून त्यांची प्रकृती स्थिर आहे. (Omicron Covid Variant in Pune)

 

 

Web Title :- Omicron Covid Variant in Pune | Worrying! Introduction of Omicron Covid Variant in Pune; 6 patients in Pimpri-Chinchwad and one patient in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PAN-Aadhaar | कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर त्याच्या PAN Card आणि Aadhaar Card चे काय करावे? जाणून घ्या नियम

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 81 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | मद्यप्राशन करुन भरधाव बुलेट चालवणे बेतलं जीवावर, एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

PM Kisan | तुमच्या स्टेटसमध्ये सुद्धा लिहीलाय का ‘हा’ शब्द, जाणून घ्या काय आहे अर्थ आणि केव्हापर्यंत येईल रक्कम?

Pune Crime | एक्सर्बिया डेव्हलपर्सकडून 45 लाखांची फसवणूक ! कंपनीचे संचालक विशाल नहार, राहूल नहार, सचिन पाटील, नितीन सैद यांच्यावर FIR