Omicron Covid Variant | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले संकेत, म्हणाले…

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – Omicron Covid Variant | एकीकडे दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने (Omicron) जगाला धास्ती लागलीय. ओमायक्रॉन व्हेरिएंटने भारतात शिरकावही केला आहे. या पार्श्वभुमीवर आता महाराष्ट्रातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आपण जर काळजी घेतली नाही तर तिसरी लाट ओमायक्रॉनची (omicron covid variant) देखील असू शकते, तिसऱ्या लाटेसाठी राज्य सज्ज आहे पण सध्या निर्बंध किंवा लॉकडाऊन लावण्याचा कोणताही विचार नाही, तसं केल्यास लोकांना त्रास होईल, असं राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे. त्यावेळी ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.

 

त्यावेळी बोलताना राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले, ‘ओमायक्रॉनची संसर्ग होण्याची गती जास्त आहे. मात्र त्याला घाबरण्याचं काम नाही. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लोकांना जे अनुभव आले त्यामुळे ओमायक्रॉनची (Omicron Covid Variant) दहशत वाटणं साहजिक आहे. कर्नाटकमध्ये 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेत. त्यामुळे संसर्गाची भीती वाटते. पण, आपण जर काळजी घेतली नाही तर तिसरी लाट ओमायक्रॉनचीही असू शकते, त्यामुळे नागरिकांनी लसीकरण (Vaccination) करून घ्यावं, मास्क काढू नये, असं ते म्हणाले.

पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले, ‘सध्या राज्यात निर्बंध किंवा लॉकडाऊन (Lockdown) लावला जाणार नाही.
निर्बंध लावले तर लोकांना ते त्रासदायक ठरतील. विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांबाबत केंद्र सरकारने ज्या सूचना केल्या आहेत,
त्यांची अंमलबजावणी सुरूय. तसेच, ’12 वर्षावरील मुलांना लसीकरण केलं पाहिजे अशी मागणी आम्ही केंद्राकडे केली असून केंद्राने याबाबतीत लवकर निर्णय घ्यावा.
5 वर्षाखालील मुलांना ओमायक्रॉनचा अधिक धोका आहे असं दक्षिण आफ्रिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेसच्या डॉक्टरांनी म्हटलंय.
यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

दरम्यान, ‘तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आवश्यक सर्व गोष्टींचा आढावा घेतला आहे.
लहान मुलांना काय आवश्यक असेल त्याचाही आढावा घेऊन तयारी केली आहे.
पण ही लाट येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 85 टक्के पहिला तर 45-46 टक्के दुसरा डोस नागरीकांना दिलेला आहे.
त्यामुळे दुसरा डोस नागरिकांनी तातडीने घ्यावा, असं देखील राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Omicron Covid Variant | Maharashtra health minister rajesh tope gave hints about the third wave of corona Omicron Covid Variant

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Rains | बंगालच्या उपसागरात ‘जवाद’ चक्रीवादळ ! किनारपट्टी भागात रेड अलर्ट; पुढील 2 ते 3 तासात पुण्यासह 16 जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या सरी

Jay Bhanushali | अभिनेता जय भानुशालीसाठी लेक ताराने गायलं गाणं, अतिशय गोड व्हिडीओ तुफान व्हायरल

Income Tax Return 2021 | घरबसल्या ऑनलाइन फाईल करा ITR, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया