Omicron Covid Variant | ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली; दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेले तब्बल 9 प्रवासी बाधित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनानंतर आता ओमायक्रॉन (Omicron Covid Variant) या विषाणूमुळे जगावर पुन्हा एकदा संकट ओढवले आहे. अनेक देशांनी पुन्हा निर्बंध लावले असून भारतातही कठोर पावले उचलण्यात आली आहे. पण तरीही कर्नाटकमध्ये नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे (Omicron Covid Variant) दोन रूग्ण आढळले. त्यानंतर आता मुंबईतही आफ्रिकेतून (South Africa to Mumbai) आलेले तब्बल ९ प्रवासी बद्धित आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

 

 

 

 

मुंबई महानगर पालिकेने (BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १० नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेतील एका प्रवाशासह ९ आंतरराष्ट्रीय प्रवासी कोविड-१९ पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंग साठी पाठवले असून या रुग्णांना ओमायक्रॉनची बाधा झाली की नाही हे स्पष्ट होणार आहे.

 

कर्नाटकात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. महत्त्वाचे म्हणजे कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात आढळलेल्या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण पुन्हा दक्षिण आफ्रिकेला गेल्याचे समोर आले आहे.

 

Web Title :-  mumbai 9 traveler positive came from south africa bmc Omicron Covid Variant

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा