Homeताज्या बातम्याOmicron Covid Variant | 1 नोव्हेंबरनंतर पुण्यात प्रवाशांची तपासणी करण्याचे महापालिकेला आदेश

Omicron Covid Variant | 1 नोव्हेंबरनंतर पुण्यात प्रवाशांची तपासणी करण्याचे महापालिकेला आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ओमायक्रॉन विषाणूच्या (Omicron Covid Variant) पार्श्वभूमीवर परदेशातून 1 नोव्हेंबर नंतर आलेल्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्याचे आदेश राज्य आरोग्य विभागाने (State Health Department) आज दिले आहेत. त्यानुसार पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) तातडीने कार्यवाहीचे नियोजन करत असल्याची माहिती आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती (Dr. Ashish Bharti) यांनी दिली. (Omicron Covid Variant)

ओमायक्रॉनच्या (Omicron Covid Variant) पार्श्वभूमीवर बहुतांश देशांनी मागील काही दिवसांत आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. यानंतरही काही देशांत ओमायक्रोनचा संसर्ग वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या देशातही विमान तळावर येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट (RT PCR test) अनिवार्य करण्यात आली आहे. तर राज्य शासनाने (Maharashtra Government) यापुढे जाऊन या प्रवाशांना विलगिकरणात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान राज्य आरोग्य विभागाने घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग दरम्यान राज्यात 1 नोव्हेंबर नंतर आलेल्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्नाटकात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण

ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे खबरदारी म्हणून सरकारने सूचना दिल्या असताना आता भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंट विषाणूचा शिरकाव झाला आहे. कर्नाटकच्या धारवाड (Karnataka, Dharwad) येथे ओमायक्रॉन व्हेरिएंटचे दोन रुग्ण सापडले आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) दिली आहे. त्यामुळे आता भारताच्या चिंतेत भर पडली आहे.

Web Title : Omicron Covid Variant | Municipal Corporation ordered to inspect passengers in Pune after November 1

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

GST on Notice Period | आता नोकरीला ‘रामराम’ करणे देखील महागात पडणार,
नोटीस पिरियडसाठी भरावा लागेल GST

Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक

Maharashtra Rains | पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस; जाणून घ्या कोठे किती झाला पाऊस

Central Bank of India Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी भरती; पगार 1 लाख रूपयांपर्यंत रुपये 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News