Homeताज्या बातम्याOmicron Covid Variant | अखेर भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव ! कर्नाटकमध्ये 2...

Omicron Covid Variant | अखेर भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव ! कर्नाटकमध्ये 2 रुग्ण सापडले; महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Omicron Covid Variant | दक्षिण आफ्रिका देशात आढळून आलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे (Omicron Covid Variant) जगाला चिंता लागली असतानाच आता भारतात धोका वाढला असल्याचं दिसत आहे. एकीकडे ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे खबरदारी म्हणून सरकारने सुचना दिल्या तर आता भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंट विषाणुचा अखेर शिरकाव झाला आहे. कर्नाटकच्या धारवाड (Karnataka, Dharwad) येथे ओमायक्रॉन व्हेरिएंटचे दोन रुग्ण सापडले आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) दिली आहे. त्यामुळे आता भारताच्या चिंतेत भर पडली आहे.

कर्नाटकमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेले 2 रुग्ण कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने (Omicron Covid Variant) बाधित झाले आहेत. एक रुग्ण हा 64 वर्षाचा आहे. तर दुसरा रुग्ण हा 44 वर्षांचा आहे. या दोन्ही रुग्णांना सौम्य लक्षणे दिसून आली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नव्हती. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल रात्री या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह (Positive) आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र आणि केरळमध्येच 10 हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. देशातील इतर रुग्णांच्या संख्येने हा आकडा 55 टक्के इतका आहे. 49 टक्के लोकांना कोरोनाचे डोस दिल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्या कमी झाल्याचं दिसून आल्याचं केंद्राने सांगितलं आहे. दरम्यान, जगातील 29 देशात ओमिक्रॉनचा फैलाव झाल्याचं देखील केंद्राचे संयुक्त सचिव लव अग्रवाल (Lav Agarwal) यांनी सांगितलं आहे.

 

Web Title : Omicron Covid Variant | Omicron Covid Variant two cases omicron were found india karnataka state

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

GST on Notice Period | आता नोकरीला ‘रामराम’ करणे देखील महागात पडणार,
नोटीस पिरियडसाठी भरावा लागेल GST

Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक

Maharashtra Rains | पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस; जाणून घ्या कोठे किती झाला पाऊस

Central Bank of India Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी भरती; पगार 1 लाख रूपयांपर्यंत रुपये 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News