Omicron Covid Variant | पहिल्या संसर्गानंतर 3 पट लवकर संक्रमित करतो ओमिक्रॉन, ‘या’ लोकांना धोका जास्त; WHO च्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Omicron Covid Variant | जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन (chief scientist soumya swaminathan) यांनी सोमवारी म्हटले की, कोविड -19 च्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत, ओमिक्रॉन व्हेरिएंटमध्ये व्हायरसच्या पहिल्या हल्ल्याच्या 90 दिवसानंतर पुन्हा संसर्गाची शक्यता तीन पट जास्त आहे. CNBC-TV18 सोबत चर्चा करताना, डॉ. स्वामीनाथन यांनी म्हटले की, व्हेरिएंटचा विषाणु (Omicron Covid Variant) आणि तो पसरण्याचा डाटा मिळण्यास उशीर लागेल, सध्या शास्त्रज्ञांना जे माहित आहे ते हे आहे की, दक्षिण अफ्रीकेत ओमिक्रॉन प्रमुख व्हेरिएंट आहे.

 

दोन ते तीन आठवडे प्रतीक्षा करावी लागेल
स्वामीनाथन यांनी म्हटले, डेल्टा व्हेरिएंट (Delta Variant) च्या तुलनेत ओमिक्रॉनमध्ये संसर्गाच्या 90 दिवसानंतर पुन्हा संसर्ग तीन पट जास्त सामान्य आहे. सध्या ओमिक्रॉन संसर्गाची क्लिनिकल वैशिष्ट्ये समजण्यासाठी हा प्रारंभीचा काळ आहे.

 

प्रकरणांमध्ये वाढ आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यामध्ये एक अंतर आहे. हा आजार किती गंभीर आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्हाला रूग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या दराचा अभ्यास करण्यासाठी दोन ते तीन आठवडे प्रतीक्षा करावी लागेल.

 

दक्षिण अफ्रीकेत मुलांच्या संसर्गाचा दर जास्त
त्यांनी म्हटले की, दक्षिण अफ्रीकेत ओमिक्रॉन व्हेरिएंटची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. रिपोर्ट सांगतात की, तिथे या स्ट्रेनमुळे मुले जास्त संक्रमित होत आहेत. दक्षिण अफ्रीकेत टेस्टिंग सुद्धा वाढवली आहे. (Omicron Covid Variant)

 

तर मुलांना जास्त संसर्ग होण्याची शक्यता
स्वामीनाथन यांनी सांगितले की, सध्या मुलांसाठी जास्त लस उपलब्ध नाहीत आणि केवळ काही देशांनीच मुलांसाठी लसीकरण सुरू केले आहे आणि यामुळे मुलांमध्ये प्रकरणे वाढू शकतात. त्यांनी म्हटले की, मुलांसाठी खुप जास्त लशी उपलब्ध नाहीत आणि खुप कमी देश मुलांचे लसीकरण करत आहेत.

प्रकरणे वाढल्यास मुले आणि असंक्रमित लोकांना जास्त संसर्ग होऊ शकतो.
आम्ही अजूनही डेटाची प्रतीक्षा करत आहोत जेणेकरून मुलांवर ओमिक्रॉन व्हेरिएंटचा परिणाम नष्ट करता येईल.

 

यावर अवलंबून आहे व्हेरिएंट व्हॅक्सीनची गरज
स्वामीनाथन यांनी म्हटले की, आपल्याला लसीकरणावर एक व्यापक आणि शास्त्रीय दृष्टीकोन अवलंबण्याची गरज आहे.
हा तोच व्हायरस आहे ज्यास आपण तोंड देत आहोत आणि यासाठी बचावाचे उपाय तेच असतील.
जर आपल्याला व्हेरिएंट व्हॅक्सीनची गरज असेल, तर हे या गोष्टीवर अवलंबून असेल की, व्हेरिएंटमध्ये किती इम्यून एस्केप आहे.

 

लसीकरण करण्यास प्राधान्य द्यावे
त्यांनी म्हटले की, सर्व देशांनी वय आणि क्षेत्राच्या आधारावर व्हॅक्सीनच्या आकड्यांचा अभ्यास केला पाहिजे.
जेणेकरून ते लोक शोधता येतील जे व्हॅक्सीनेशनमधून सुटले आहेत.
स्वामीनाथन यांनी म्हटले संसर्ग कमी करण्यासाठी 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांचे लसीकरण करण्यास प्राधान्य असले पाहिजे.

 

Web Title :- Omicron Covid Variant | omicron fuels reinfection 3 times more than delta variant who chief scientist soumya swaminathan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना पती-पत्नीला दर महिना देईल 5000 च्या जवळपास रक्कम, फक्त करावी लागेल इतकी गुंतवणूक

Pune Crime | खरेदीला आलेल्यांनी बंदुकीचा धाक दाखवत टाकला दरोडा; घटना CCTV मध्ये कैद (व्हिडीओ)

Corona Kavach Policy | कोरोना काळात मिळू शकतं 5 लाख रुपयांपर्यंतचं विमा कव्हर, ‘हे’ आहेत फायदे; जाणून घ्या