ताज्या बातम्या

Omicron Covid Variant | दिलासादायक! महाराष्ट्रातील पहिला ओमायक्रॉन बाधित रुग्ण ‘कोरोना’मुक्त

कल्याण-डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाइन – आफ्रिकन देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटने (Omicron Covid Variant) धुमाकूळ घातला असताना महाराष्ट्रात कल्याण-डोंबिवलीमध्ये (Kalyan-Dombivali) पहिला रुग्ण आढळून (First patient in Maharashtra) आला. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron Covid Variant) रुग्ण आढळून आल्याने राज्यात खळबळ उडाली होती. मात्र, आता त्याच रुग्णाच्या बाबतीत दिलासादायक वृत्त समोर आले आहे. ओमायक्रोन बाधित रुग्ण बरा (Recover)  झाला असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. हा रुग्ण दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) केपटाऊन (Cape Town) शहरातून आला होता. रुग्ण बरा झाला असला तरी त्याला पुढील 7 दिवस होम क्वारंटाईन (Home quarantine) राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

 

राज्यात सापडलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या (Omicron Covid Variant) रुग्णावर 27 नोव्हेंबर पासून केडीएमसीच्या कोव्हिड सेंटरमध्ये (KDMC Covid Center) उपचार सुरु होते. त्याला कोणतीही लक्षण नसल्याने त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याचा आरटीपीसीआर अहवाल (RT PCR report) निगेटिव्ह आल्याने त्याला आज (बुधवार) रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. डोंबिवलीत आढळलेला हा रुग्ण देशातील पहिला रुग्ण डिस्चार्ज झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याचा आज वाढदिवस असून त्याच दिवशी त्याने कोरोनावर मात केल्याची माहिती, महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (Municipal Commissioner Dr. Vijay Suryavanshi) यांनी दिली. उर्वरित नायजेरिया मधून आलेल्या त्या 4 कोरोनाबाधित रुग्णांच्या जीनोम सिक्वेन्सिंग अहवालाची अद्याप प्रतीक्षा असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

दक्षिण आफ्रिका केपटाऊनहून हा रुग्ण दुबई, दिल्ली ते मुंबई असा प्रवास करुन 22 नोव्हेंबर रोजी डोंबिवलीत आला होता.
त्याला ताप आल्याने त्याने स्वत: जाऊन डॉक्टरांकडे तपासणी केली.
टेस्ट केली असता त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह (Corona test positive) आली होती.
महापालिकेने याची गांभीर्याने देखल घेऊन 27 नोव्हेंबरला त्याला महापालिकेच्या आर्ट गॅलरीतील कोविड सेंटरमध्ये ठेवले.
त्याचे नमुने जीनोम सेक्सिंग करता (genome sequencing) एनआयव्हीला (NIV) पाठवले होते. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
राज्यातील पहिला ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आल्याने डोबिवलीसह राज्याची धास्ती वाढली होती.
मात्र, आज तो बरा झाल्याने आरोग्य प्रशासनासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

 

Web Title :- Omicron Covid Variant | omicron infected patient corona free discharged from hospital today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Thackeray Government | ठाकरे सरकारकडून ‘कोरोना’मुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 50 हजारांचे सहाय्य; ‘या’ पद्धतीने कमीत कमी कागदपत्रांद्वारे घरबसल्या ऑनलाईन अर्ज करा, जाणून घ्या

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 1040 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Variable Dearness Allowance | ‘या’ लाखो कामगारांच्या व्हेरिएबल महागाई भत्त्यात 4 टक्केपेक्षा जास्त वाढ, आता किती टक्के मिळेल जाणून घ्या

Back to top button