Omicron Covid Variant | केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय ! दिल्लीत पुन्हा निर्बंध लागू; शाळा-कॉलेज, थिएटर्स पुन्हा बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Omicron Covid Variant | कोरोना आणि कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने (Omicron Covid Variant) देशाला चिंतेत टाकलं आहे. पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा आणि केंद्रीय गृहमंत्रालय अलर्ट झालं आहे. ओमायक्रॉनच्या बाधितांची एकूण संख्या 578 वर पोहोचली असून, त्यातील 151 जण बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य खात्याने (Central Health Department) दिली. जवळपास 19 राज्यात याचा प्रसार झाला आहे. या पार्श्वभुमीवर दिल्लीतील केजरीवाल सरकारने (Kejriwal Government) मोठा निर्णय घेतला आहे.

मागील काही दिवसांपासून दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या वाढीचा दर हा 0.5 टक्क्यांवर आहे. यामुळे ‘दिल्लीत ग्रेडेड रेस्पॉन्स अ‍ॅक्शन प्लान’नुसार दिल्लीत यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला गेला आहे. अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी दिली. ‘दिल्लीत काही गोष्टींवर निर्बंधे घातले जात आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जरी बहुतेक प्रकरणांत रुग्णालयात जाण्याची गरज नसली, ऑक्सिजन नाही, आयसीयू आणि व्हेंटिलेटरची गरज नाही, तर ओमायक्रॉन संक्रमित लोक घरीच बरे होत आहेत, असं केजरीवाल यांनी सांगितलं. (Omicron Covid Variant)

दिल्लीत निर्बंध काय?

रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असेल.

शाळा, महाविद्यालय बंद राहणार.

थिएटर्स, मल्टिप्लेक्स, बँक्वेट हॉल, स्पा, जिम आणि मनोरंजन पार्क बंद राहतील.

दुकाने आणि वस्तू सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सम-विषम तत्त्वावर उघडतील.

आठवडी बाजार एका झोनमध्ये फक्त एकच उघडेल, ज्यामध्ये फक्त 50 टक्के दुकानदारांना परवानगी असेल.

– मेट्रो आणि बसेस 50 टक्के क्षमतेने धावतील.

रेस्टॉरंट्स 50 टक्के क्षमतेसह सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत उघडतील.

50 टक्के क्षमतेसह बार दुपारी 12 ते रात्री 10 वाजेपर्यंत उघडतील.

लग्न समारंभात फक्त 20 लोकांनाच परवानगी असेल, तेसच, सलून उघडता येतील.

धार्मिक स्थळे खुली राहतील मात्र भाविकांना जाण्यास मनाई आहे. सांस्कृतिक उपक्रम आणि क्रीडा उपक्रमांवर बंदी.

 

Web Title :- Omicron Covid Variant | omicron news yellow alert delhi schools colleges theaters closed again restrictions imposed cm

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corona | पुणे शहरात रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ, गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 171 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Anti Corruption Bureau Pune | पुण्यात वॉरंट रद्द करण्यासाठी 2 हजाराची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime | पुण्यात जादुटोणा करण्याची भिती दाखवून महिलेकडे शरीरसुखाची मागणी; भोंदूबाबाला वाकड पोलिसांकडून अटक