Omicron Covid Variant | ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे किती दिवसांनी जाणवते? WHO ने सांगितले – ‘अशी करा आपली इम्युनिटी बूस्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Omicron व्हेरिएंटमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) नुसार, सध्या हा प्रकार 110 देशांमध्ये पसरला आहे. जगभरात ओमिक्रॉन (Omicron Covid Variant) रुग्णांची संख्या वाढत आहे. जरी काही तज्ञांच्या मते, ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Covid Variant) फारसा धोकादायक नसला, तरी डब्ल्यूएचओने या आजाराबाबत निष्काळजीपणा न करण्याचा इशारा दिला आहे.

 

डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस म्हणाले की, ओमिक्रॉन डेल्टा प्रकारापेक्षा कमी गंभीर आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की निष्काळजीपणा करावा. लस देखील Omicron च्या बाबतीत कुचकामी ठरली आहे असे वाटत असले तरीही लस घेतली पाहिजे. याशिवाय डब्ल्यूएचओच्या महासंचालकांनी हेही सांगितले की संसर्गानंतर किती दिवसांनी ओमिक्रॉनची लक्षणे (Omicron Symptoms) दिसतात.

 

ओमिक्रॉनची लक्षणे किती दिवसांनी दिसतात :
डेल्टा प्रकार खूप वेगाने पसरतो, जरी डब्ल्यूएचओच्या मते, ओमिक्रॉन व्हेरिएंटचे निदान सध्या रुग्णाच्या जीनोम सिक्वेन्सिंगने होते आहे. ओमिक्रॉनच्या चाचणीसाठी काही किटही आल्या आहेत. (After how many days do the symptoms of Omicron appear?)

 

डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस यांनी म्हटले आहे की ओमिक्रॉन व्हेरिएंट अत्यंत धोकादायक आहे, त्याची लक्षणे 3 ते 5 दिवसांत दिसू लागतात. पूर्वीच्या व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये त्याची लक्षणे 2 दिवस ते दोन आठवड्यात दिसून येतात. यूके हेल्थ एजन्सीने असेही म्हटले आहे की ओमिक्रॉन व्हेरिएंट फार कमी वेळात संसर्ग करत आहे. (Omicron Covid Variant)

ओमिक्रॉन सामान्य सर्दी नाही (Omicron is not a common cold):
डब्ल्यूएचओ मधील मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी देखील ओमिक्रॉनबाबत निष्काळजीपणा न करण्याचा इशारा दिला आहे.
सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले की, ओमिक्रॉन ही सामान्य सर्दी नाही. याची लागण झालेल्या जगभरातील लोकांना रुग्णालयात दाखल केले जात आहे.
वेळीच दक्षता न घेतल्यास जगासाठी डोकेदुखी ठरू शकतो.
ते म्हणाले की, ओमिक्रॉनमुळे जगाची आरोग्य व्यवस्थाही कोलमडू शकते, त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे.

 

इम्युनिटी स्ट्राँग करून ओमिक्रॉनपासून दूर राहा (Stay away from Omicron by strengthening immunity)
ओमिक्रॉन टाळण्यासाठी इम्युनिटी वाढवणे खूप महत्वाचे आहे.
ज्या लोकांची इम्युनिटी कमजोर आहे. त्यांना ओमिक्रॉनच्या संसर्गाचा धोका खूप जास्त आहे. यासाठी इम्युनिटी मजबूत करणे आवश्यक आहे.

 

आयुष मंत्रालयाच्या (ayush ministry) मते, इम्युनिटी मजबूत करण्यासाठी काढा खूप फायदेशीर (immunity booster food) आहे.
आयुष मंत्रालयाने तुळस, दालचिनी, काळी मिरी, सुंठ, मनुका, गूळ आणि लिंबू यांचा एक काढा बनवून दिवसातून दोनदा पिण्याचा सल्ला दिला आहे.
याशिवाय जेवणात हळद, धने, जिरे, लसूण खाण्याचाही सल्ला दिला आहे.

 

 

Web Title :- Omicron Covid Variant | omicron virus how many days does take to be detected boost your immunity like this you should know

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Rains | राज्यात पुन्हा होणार मुसळधार पावसासह गारपीट?, ‘या’ 9 जिल्ह्यांना ‘हाय’ अलर्ट

Uric Acid Control Tips | यूरिक अ‍ॅसिडच्या रूग्णांनी दूध सेवन करावे का? एक्सपर्टकडून जाणून घ्या सविस्तर

Five State Assembly Election-2022 | उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा राज्यांतील विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं; जाणून घ्या सर्व तारखा