Omicron Covid Variant Pune | कोरोनाच्या आढावा बैठकीनंतर अजित पवारांचा इशारा; म्हणाले – ‘…तर पुढील आठवड्यात आम्ही कडक निर्णय घेणार’ (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Omicron Covid Variant Pune | पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात (Pune and Pimpri Chinchwad) मागील काही दिवसांत ओमिक्राॅन व्हेरिएंटचे (Omicron Covid Variant Pune) रुग्ण सापडले. त्यामुळे याठिकाणी अनेकांना धसका बसला. दरम्यान आता दिलासादायक माहिती पुढं आली आहे. ‘पुण्यातील एक आणि पिंपरी-चिंचवड मधील 6 पैकी 4 ओमिक्राॅनचे रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. अजित पवार आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

 

काय म्हणाले अजित पवार?

कोरोना, आणि आताच्या ओमिक्राॅन व्हेरिएंटच्या (Omicron Covid Variant Pune) आढावा बैठकीसाठी अजित पवार आज (शुक्रवारी) पुण्यात (Pune) आले होते. माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘पुण्यातील 1 तर पिंपरी-चिंचवडमधील 6 पैकी 4 ओमिक्राॅनचे रुग्ण बरे झाले आहेत. यात 44 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, 7 आणि दीड वर्षीय मुलींचा समावेश आहे. तर 12 आणि 18 वर्षीय मुलींचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.

 

 

दुसऱ्या डोसचे प्रमाण पहिल्या डोसच्या तुलनेत कमी आहे. ओमिक्राॅनमुळे (Omicron Covid Variant Pune) लोक दुसऱ्या डोसलाही प्रतिसाद द्यायला लागलेत. पण जुन्नर (Junnar News), दौंड (Daund News), पुरंदर (Purandar News) आणि बारामती (Baramati News) या 4 तालुक्यात डोसचे प्रमाण कमी आहे. ते वाढवण्यास प्रशासनास सांगितलं आहे. येत्या आठवड्यात आम्ही या 4 तालुक्यात दुसर्‍या डोससाठी प्रयत्न करणार आहोत.
परंतु, पुढच्या आठवड्यात या 4 तालुक्यातील नागरिकांनी याला प्रतिसाद नाही दिला
तर पुढील आठवड्यात आम्ही कडक निर्णय घेणार आहोत. असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

 

कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये तूर्तास कोणताही बदल नाही.
परिस्थिती पाहून निर्णय घेऊ. तसेच, बुस्टर डोसबाबात (Booster dose) विचार सुरु आहे.
पण त्यासाठी देशपातळीवर केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात यावा, तर,
सीरम इन्स्टिट्यूटकडे बुस्टर डोस उपलब्ध आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

 

Web Title :- Omicron Covid Variant Pune | one omicron patient from pune and four patients from pimpri chinchwad were cured ajit pawar says if we will take strong decision

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा