Omicron Covid Variant | ‘ओमायक्रॉन सर्वांना मारुन टाकेल, आता मृतदेह नाही मोजायचे’ ! मेडिकलच्या प्राध्यापकाने केली पत्नी, दोन मुलाची हत्या; ‘नोट’ लिहून झाला फरार

कानपूर : वृत्त संस्था  – कोरोनाचा दक्षिण अफ्रिकेतून आलेल्या नवा व्हायरंड ओमायक्रॉनने (Omicron Covid Variant) संपूर्ण जगात आज हाहाकार माजविला आहे. जगातील अनेक देशांमध्ये तो वेगाने पसरतो आहे. या ओमायक्रॉनचा भारतालाही मोठा धोका आहे. असे असले तरी एका मेडिकल कॉलेजमध्ये असलेल्या प्राध्यापकाने या ओमायक्रॉनची (Omicron Covid Variant) चांगलीच दहशत घेतली. त्यातून त्याने आपली पत्नी आणि मुलांची हत्या केली आहे.

प्रा. सुशील सिंह हे रामा मेडिकल कॉलेजच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख होते. ते कल्याणपूर क्षेत्रातील डिव्हिनिटी अपार्टमेंटमध्ये पत्नी आणि दोन मुलांसह रहात होते. शुक्रवारी सायंकाळी पत्नी आणि मुलांची त्यांनी हतोड्याने वार करुन हत्या केली. त्यानंतर प्राध्यापकाने आपला लहान भाऊ सुनिल सिंह याला व्हॉटसअ‍ॅप मेसेज केला. हा मेसेज पाहून सुनिल सिंह हादरला. ‘‘सुनिल पोलिसांना माहिती दे की, मी डिप्रेशनमध्ये चंद्रप्रभा, शिखर आणि खुशीची हत्या केली आहे.’’ हे लिहिले होते. मेसेज वाचल्यावर सुनिल तातडीने त्यांच्या घरी गेले. गार्डच्या मदतीने दरवाजता तोडला असता आतमध्ये तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले. मात्र, प्राध्यापक सिंह कोठेही मिळून आला नाही. डॉ. सुशील कुमार सिंह यांच्या घरी त्यांची डायरी आढळून आली असून त्यात त्यांनी अनेक गोष्टी लिहिल्या आहेत.

त्यात त्यांनी लिहिले आहे की, ओमायक्रॉन कोरोना (Omicron Covid Variant) आता सर्वांना मारुन टाकेल, आता मृतदेह नाही मोजायचे. माझ्या हलगर्जीपणामुळे सध्या अशा अडचणीत अडकलो आहे की, त्यातून बाहेर पडणे अशक्य नाही. माझे काहीच भविष्य नाही. अखेर मी पूर्ण विचार करुन माझे कुटुंब संपवित आहे आणि स्वत:लाही संपवत आहे. याला इतर कोणीही जबाबदार नाही.

यात प्राध्यापक सिंह यांनी पुढे लिहिली आहे की, गंभीर आजाराने मला ग्रासले आहे.
पुढे काहीच भविष्य दिसत नाही. शेवटी याशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय नाही.
मी माझ्या कुटुंबियांना या त्रासात सोडून जाऊ शकत नाही.
सर्वांना मुक्तीच्या मार्गावर सोडत आहे. सगळा त्रास एकाच क्षणात संपवत आहे.
माझ्यानंतर मी कोणालाही त्रासात पाहू शकत नाही.
अलविदा… डोळ्याच्या गंभीर आजारामुळे हे पाऊल मी उचलले आहे.
शिकवणे हे माझे काम आहे. आता डोळेच राहिले नाहीत तर मी करु, असे त्यांनी आपल्या डायरीमध्ये लिहिलेले आढळून आले आहे.

Web Title : Omicron Covid Variant | UP professor absconding after killing wife and two children in kanpur informed younger brother on whatsapp Omicron Covid Variant

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

GST on Notice Period | आता नोकरीला ‘रामराम’ करणे देखील महागात पडणार,
नोटीस पिरियडसाठी भरावा लागेल GST

Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक

Maharashtra Rains | पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस; जाणून घ्या कोठे किती झाला पाऊस

Central Bank of India Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी भरती; पगार 1 लाख रूपयांपर्यंत रुपये