Omicron Covid Variant | दिलासादायक ! ‘इथं’ कोरोनाचा वेग मंदावतोय, WHO ची महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने (Corona Third Wave) जगभरात थैमान घातले आहे. तिसऱ्या लाटेत अनेक लोक संक्रमित होत आहेत. भारतासह (India) जगातील अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनची (Omicron Covid Variant) अनेक प्रकरणे समोर येत आहेत. ओमिक्रॉन डेल्टा पेक्षा (Delta Covid Variant) कमी धोकादायक असल्याचे मानले जाते. मात्र तो जास्त संसर्गजन्य आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेकडून (World Health Organization) एक चांगली आणि महत्त्वाची माहिती समोर येत आहे. आफ्रिकेतील (Africa) लाट हळूहळू कमी होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे.

 

आफ्रिकेतील ओमिक्रॉनमुळे आलेली लाट 6 आठवड्यांच्या वाढीनंतर कमी होऊ लागली आहे. 11 जानेवारीपर्यंत आफ्रिकेत 10.2 दशलक्ष कोविड-19 ची प्रकरणे नोंदवण्यात आली. दक्षिण आफ्रिका (South Africa), जिथे साथीच्या आजाराने संक्रमित लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे, तिथे गेल्या एका आठवड्यात संक्रमितांच्या संख्येत 14 टक्क्यांनी घट झाली आहे. (Omicron Covid Variant)

 

ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत आढळला होता. आता तेथे देखील साप्ताहिक संसर्गामध्ये 9 टक्क्यांनी घट झाली आहे. पूर्व आणि मध्य आफ्रिकन प्रदेशातही (African Territory) घट झाली आहे. उत्तर आणि पश्चिम आफ्रिकन प्रदेशात प्रकरणांमध्ये वाढ होत आहे, उत्तर आफ्रिकेत गेल्या आठवड्यात 121 टक्क्यांची वाढ झाली, हे लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने येथे अधिक लसीकरण (Vaccination) कव्हरेजसाठी सांगितले होते.

आफ्रिकेत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रादेशिक संचालक डॉ. मात्शिदिसो मोएती (Dr. Matshidiso Moeti) म्हणाले, सुरुवातीची चिन्हे सूचित करतात की देशातील लाट वेगवान आणि लहान होती, परंतु अस्थिरतेची कमतरता नाही. आफ्रिकेत साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी ज्या महत्त्वाच्या उपाययोजनांची नितांत गरज आहे, ती अद्यापही सुरु आहे. मात्र, त्यासाठी इथल्या नागरिकांना लवकरात लवकर लस मिळणे गरजेचे आहे.

 

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस (Director General Tedros Adhanom Gebreiusus) यांनी देखील अलीकडेच चिंता व्यक्त केली होती.
आफ्रिकेच्या 85 टक्के पेक्षा जास्त लोकसंख्येला, किंवा एक अब्ज लोकांना अद्याप लसीचा एकही डोस मिळालेला नाही.
संपूर्ण खंडातील लोकसंख्येपैकी केवळ 10 टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे.

 

Web Title :- Omicron Covid Variant | World health organization WHO says wave in africa is slowly receding

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा