Omicron Genetic Pattern | बिहारमध्ये आढळला ओमायक्रॉन व्हेरिएंटचा जेनेटिक पॅटर्न BA-2; डेल्टापेक्षा सातपट अधिक संसर्ग

पाटणा : वृत्तसंस्था – Omicron Genetic Pattern | ओमायक्रॉनचे रुग्ण (Omicron Variant) वाढत असताना आता बिहारमध्ये (Bihar) ओमायक्रॉन व्हेरिएंटचा जेनेटिक पॅटर्न BA-2 (Omicron Genetic Pattern) आढळून आला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा आणखी सतर्क झाली आहे. दोघांचाही संसर्गाचा वेग सारखा असून डेल्टा पेक्षा सातपट अधिक वेगाने याचा संसर्ग होतो असे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) वैज्ञानिकांनी सांगितले आहे.

शरीरातील स्पाईक प्रोटीनचे एस. मार्कर ओमायक्रॉन व्हेरिएंट स्किप करत आहे. संसर्गानंतर 40 ते 45 म्यूटेशन समोर आले आहेत. तर 32 नमुन्यांच्या जीनोम सिक्वेंसिंगमध्ये (Genome Sequencing) 27 नमुन्यात ओमायक्रॉन व्हेरिएंट असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, चार नमुन्यात डेल्टा व्हेरिएंट (Delta Variant) आढळला होता. मात्र, एका नमुन्यात व्हेरिएंटची ओळख पटली नाही. त्यानंतर याचा जेनेटिक पॅटर्न बीए-2 सापडल्याचे आयजीआयएमएसच्या प्रो. नम्रता कुमारी (Prof. Namrata Kumari) व डॉ. अभय कुमार सिंह (Dr. Abhay Kumar Singh) यांनी सांगितले. डेल्टा संसर्गामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांचा मृत्यूदर 8 ते 10 टक्के झाला होता, अशी माहिती डॉ. बी के चौधरी (Dr. B. K. Choudhary) यांनी दिली. (Omicron Genetic Pattern)

बिहारमध्ये वीकेंड कर्फ्यू ?

कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात वीकेंड लॉकडाऊनचा (Weekend lockdown) निर्णय होऊ शकतो. सध्या संचारबंदी लागू असून 21 जानेवारीपर्यंत हा नियम लागू आहे. याशिवाय शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वीकेंड लॉकडाऊनचा निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीकडे आता लक्ष लागले आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या विमानांवरील बंदी उठविली –

सुमारे महिनाभरानंतर दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) येणाऱ्या प्रवासी विमानांवरील निर्बंध युरोपियन संघाने हटविले आहेत. सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेतच ओमायक्राॅन व्हेरिएंट आढळला होता. त्यानंतर नाेव्हेंबरच्या अखेरीस निर्बंध लावण्यात आले होते.

लक्ष्य गाठण्यासाठी एकाच दिवशी दाखवले 117 पॉझिटिव्ह –

समस्तीपूर जिल्ह्यातील (Samastipur) कल्याणपूर येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लक्ष गाठण्यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा तंत्रज्ञाने (लॅब टेक्निशियन) कचऱ्याच्या डब्यात टाकलेले स्वॅब पुन्हा आरटीपीसीआरसाठी पाठवून दिले व त्यामुळे एकाच दिवसात 115 जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह (Corona positive) आला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. दरम्यान यांसंदर्भात तपास केल्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ दिनेश झा दोषी आढळला. त्याला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सत्येंद्र कुमार (Dr. Satyendra Kumar) गुप्ता यांनी तत्काळ निलंबित केले. त्यानंतर इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचा तपास करण्याचे आदेश दिले गेले आहेत. 5 जानेवारीला तपासणी करून घेणाऱ्यांची संख्या कमी होती. त्यामुळे लक्ष गाठण्यासाठी वेगवेगळ्या नावांनी नमुने तयार करून तपासणीसाठी पाठवून दिले होते.

Web Title : Omicron Genetic Pattern | genetic pattern omicron variant ba 2 found bihar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्च

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…

AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्या

Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात