Omicron च्या धोक्यादरम्यान Bus किंवा Auto ने प्रवास करत असाल तर व्हा सावध ! कोरोनाचा धोका ‘या’ 6 पद्धतीने करा कमी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Omicron | कोरोनाच्या या काळातही तुम्ही सार्वजनिक वाहनाने प्रवास करत असाल तर तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण तुम्ही दररोज अशा अनोळखी व्यक्तींसोबत प्रवास करत आहात, ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती नाही की त्यांना कोरोना आहे की नाही. या लोकांमध्ये प्रवास करणे तुमच्यासाठी कोरोनाला (Omicron) निमंत्रण देण्यासारखे ठरू शकते. अशा स्थितीत, आपण खूप सावधगिरी बाळगली पाहिजे, याबाबत काही टिप्सबद्दल जाणून घेवूयात (How To Be Safe From Corona During Bus Or Auto Travel).

 

1. शक्य असल्यास स्वतःचे वाहन वापरा
अशा स्थितीत, पहिली सूचना अशी आहे की शक्य असल्यास, सार्वजनिक वाहनाने प्रवास करणे टाळा आणि आपले खाजगी वाहन वापरा. कारण, सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना सामाजिक अंतर पाळणे कठीण आहे.

 

2. खाजगी टॅक्सी वापरा
जर तुमच्याकडे खाजगी वाहन नसेल आणि तुम्ही खाजगी टॅक्सी किंवा ऑटो बुक करू शकत असाल तर त्याने प्रवास करा. यामध्ये किमान तुम्ही एकटे प्रवास कराल आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाईल.

3. कमी प्रवासी असलेल्या वाहनात चढा
जर हे शक्य नसेल तर ज्या सार्वजनिक वाहनात लोक कमी असतील त्या वाहनाने प्रवास करण्याचा प्रयत्न करा. याच्या मदतीने तुम्ही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करू शकता. कोरोना टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हे एक मोठे शस्त्र आहे. (Omicron)

 

4. मास्क अजिबात उतरवू नका
प्रवासादरम्यान मास्क अजिबात उतरवू नका. संपूर्ण प्रवासात मास्क घाला आणि मास्क नीट वापरा. मास्कने तुमचे तोंड आणि नाक व्यवस्थित झाकले पाहिजे.

 

5. मास्क नसलेल्यांना मास्क घालायला सांगा
एवढेच नव्हे, तर तुमच्या आजूबाजूला कोणी मास्क नसलेला असेल किंवा मास्क नीट घातला नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीला मास्क नीट घालायला सांगा. जर त्याने तसे केले नाही तर तक्रार करा.

 

6. वारंवार हात सॅनिटाईज करा
वेळोवेळी आपले हात सॅनिटाईज करत रहा. सॅनिटाईज न करता डोळे, नाक, तोंड यांना हात लावू नका. हे धोकादायक ठरू शकते.

 

Web Title :-  omicron | how to be safe from corona during traveling by bus or auto omicron

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा