Omicron Positive | ओमिक्रॉन पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर होऊ नका अस्वस्थ, आवश्य करा ‘हे’ 4 उपाय; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन (Omicron Positive) व्हेरिएंट प्रथम दाखल झाला होता, जो आता भारतातही पोहोचला आहे. देशात आणि जगात पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. डेल्टा (Delta Variant) आणि ओमिक्रॉन या कोरोनाच्या दोन व्हेरिएंटच्या संसर्गाने जगभरातील शास्त्रज्ञांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ओमिक्रॉन (Omicron Positive) आणि डेल्टाबाबत अनेक अभ्यास समोर येत आहेत.

 

कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, कोरोना व्हायरसचा (Coronavirus) घातक प्रकार असलेल्या ओमिक्रॉनपासून बचाव करण्यासाठी तुम्ही काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटची वाढती प्रकरणे लोकांसाठी त्रासदायक ठरत आहेत, त्यामुळे या आजाराची लक्षणे ओळखणे अत्यंत आवश्यक आहे.

 

तज्ञांच्या मते, ओमिक्रॉन हा असाच एक प्रकार आहे, ज्याचा लसीकरण झालेल्या लोकांवर देखील परिणाम होत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एखाद्या पॉझिटिव्ह (Omicron Positive) व्यक्तीच्या संपर्कात आला असाल तर घाबरू नका, फक्त या नियमांचे पालन करा.

 

1. सेल्फ आयसोलेशन (Self isolation) :
रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर तुम्ही एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला असाल तर तुम्हाला दोन ते 14 दिवसांत कोरोना विषाणूची लक्षणे जाणवू शकतात.

 

म्हणून, तुम्हाला काही लक्षणे जाणवल्यास, तुम्ही प्रथम चाचणी करून घ्या आणि नंतर स्वतःला वेगळे करा. तथापि, काही लोकांना लक्षणे जाणवत नाहीत. अशा परिस्थितीत ते नकळत व्हायरस पसरवू शकतात.

2. या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष :
CDC नुसार, श्वास लागणे किंवा श्वास घेण्यात त्रास होणे, थकवा, स्नायू किंवा शरीरात दुखणे, ताप किंवा थंडी वाजून येणे,
खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, नाक वाहणे, चव किंवा वास कमी होणे,
मळमळ किंवा उलट्या आणि अतिसार ही लक्षणे जाणवल्यास, त्वरित चाचणी करा.

 

3. या समस्या असल्यास डॉक्टरांना भेटा :
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ज्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत, ज्यामध्ये श्वासोच्छवासाचा त्रास,
छातीत सतत दुखणे किंवा दाब येणे, जागे राहण्यास असमर्थता, त्वचेचा आणि नखांचा रंग पिवळा किंवा निळा
यांसारखी लक्षणे जाणवत असतील तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा.

 

4. मास्क घालणे आणि लसीकरण करणे (Masks and Vaccination) :
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, ओमिक्रॉन व्हेरिएंट सौम्य आणि कमकुवत मानू नका.
तो टाळण्यासाठी WHO ने मास्क घालण्याचा आणि सामाजिक अंतर पाळण्याचा सल्ला दिला आहे.
संसर्गजन्य असल्याने, हा विषाणू आधीच आजारी असलेल्या आणि लसीकरण न केलेल्या लोकांवर गंभीरपणे परिणाम करू शकतो.

 

 

Web Title :- Omicron Positive | omicron virus effect and symptoms coming in contact with positive person just do these 4 measures

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | ‘या’ कर्मचार्‍यांचा वाढणार पगार, जाणून घ्या – किती रूपयांची होईल वाढ

Pimpri Corona Updates| चिंताजनक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1500 पेक्षा अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Uric Acid | यूरिक अ‍ॅसिड वाढल्याने ‘या’ आजारांचा वाढू शकतो धोका; जाणून घ्या कसे करावे नियंत्रण