Omicron Restrictions Pune | पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू ! ख्रिसमस, थर्टी फर्स्टच्या हंगामात हाॅटेल्स, रेस्टॉरंटवर निर्बंध; जाणून घ्या सविस्तर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Omicron Restrictions Pune | कोरोना आणि कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंट रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य सरकारने (Maharashtra Government) राज्यात निर्बंध लागू केले आहेत. शासनाच्या आदेशानूसारच आता पुणे जिल्ह्यात आणि ग्रामीण भागामध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध (Omicron Restrictions Pune) लागू केले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी आज (शनिवारी) स्वतंत्र आदेश काढले आहेत. ख्रिसमस (Christmas), थर्टी फर्स्टच्या (31st First) ऐन हंगामात पुन्हा एकदा हाॅटेल्स, रेस्टॉरंटवर 50 टक्क्यांचे निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

पुणे शहरात आणि ग्रामीण भागात (Pune City and Pune Rural) नव्याने पुन्हा एकदा निर्बंध लावण्यात आले (Omicron Restrictions Pune) आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह पुणे जिल्ह्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार निर्बंध लागू केले आहेत. जिल्ह्यात शनिवार (25 डिसेंबर) रोजी पासून पुढील आदेशापर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. यात सध्या कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा (Omicron Covid Variant) प्रसार वेगाने होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pune and Pimpri
Chinchwad) या ठिकाणी ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत.
या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी पुण्यातील
निर्बंधाबाबत आदेश काढले आहेत. दरम्यान, नाताळ, लग्न सराई,
इतर सणवार व नविन वर्षाच्या स्वागताप्रित्यर्थ लोकांची गर्दी होण्याची
शक्यता जादा आहे. बाधित व्यक्तींची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात
घेता सद्यस्थितीतील निर्बंधांपेक्षा अधिक निर्बंध लागू करणे आवश्यक असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

पुणे शहर आणि ग्रामीण भागात निर्बंध –

हाॅटेल्स, रेस्टॉरंट, जिम, स्पा, सिनेमा व नाटयगृहे तेथील आसनक्षमतेच्या 50 टक्के मर्यादेच्या अधिन राहून सुरु ठेवण्यास मुभा राहील. पण, तेथे एकुण आसनक्षमता व परवानगी देण्यात आलेली 50 टक्के क्षमता याबाबत सूचना फलक दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात यावा.


विवाह समारंभ बंद जागेत आयोजित करतेवेळी 100 उपस्थितांची मर्यादा पाळण्यात यावी. तसेच मोकळया जागेत अधिकाधिक 250 व त्या ठिकाणच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जो संख्या कमी असेल इतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन केले जावे.

सामाजिक, राजकीय अथवा धार्मिक कार्यक्रमांत जेथे नागरीकांची सतत उपस्थिती राहील असे कार्यक्रम बंद जागेत आयोजित करतेवेळी अधिकतम 100 उपस्थितांची मर्यादा पाळण्यात यावी. तसेच मोकळया जागेत आयोजित करताना अधिकाधिक 250 व त्याठिकाणाच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जी संख्या कमी असेल इतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन केले जावे.


क्रिडास्पर्धा आणि सामन्यांचे आयोजन करतांना प्रेक्षक क्षमतेच्या अधिकतम 25 टक्के उपस्थितीची मर्यादा पाळणे आवश्यक.


तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन बंद जागेत करित असतांना आसन व्यवस्था फिक्स असलेल्या
ठिकाणी त्याजागेच्या 50 टक्के क्षमतेइतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे,
तर, बंद जागेत परंतु आसन व्यवस्था फिक्स नसलेल्या ठिकाणी असे कार्यक्रम
आयोजित करताना व आसन व्यवस्था त्याजागेच्या 25 टक्के क्षमतेइतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन केले जावे.

Web Title :- Omicron Restrictions Pune | omicron strict restrictions hotels and restaurants christmas thirty first new year pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | बेकायदेशीर खासगी सावकारी करणाऱ्या आशिष पाटणे याच्यावर गुन्हे शाखा युनिट 5 कडून कारवाई

बिहारमध्ये उंदरांचा नवीन ’कारनामा’, दारू आणि धरणानंतर आता X-Ray मशीनला केले टार्गेट, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 51 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी