Homeआरोग्यOmicron Symptoms in kids | जास्त ताप-सतत खोकला, मुलांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटची ही...

Omicron Symptoms in kids | जास्त ताप-सतत खोकला, मुलांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटची ही 6 विशेष लक्षणं; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Omicron Symptoms in kids | संपूर्ण जगात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या (Omicron variant) वाढत्या प्रकरणांमुळे खळबळ उडाली आहे. जगभरातील शास्त्रज्ञ या व्हेरिएंटबाबत जास्तीत जास्त माहिती जमवण्याचा प्रयत्न करत आहेत. दक्षिण अफ्रीका आणि UK च्या डेटानुसार हा व्हेरिएंट मुलांना जास्त संक्रमित करत आहे. ब्रिटिश तज्ज्ञांनुसार आगामी काळात प्रत्येकासाठी हा व्हेरिएंट एक मोठे आव्हान ठरू शकतो. (Omicron Symptoms in kids)

 

तरूणांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटची लक्षणे (Omicron symptoms) –
कोरोनाचे जेवढे व्हेरिएंट आले आहेत त्यांची मुलांवर खुप हलकी किंवा अजिबात लक्षणे दिसून आली नव्हती. एक्सपर्टनुसार, सध्या हे सांगता येऊ शकत नाही की ओमिक्रॉन किती गंभीर असेल, परंतु याच्या लक्षणांवर खुप लक्ष देण्याची गरज आहे. कारण वेळीच उपचार करता येऊ शकतात.

 

दक्षिण अफ्रीकेच्या डॉक्टरांनुसार, ओमिक्रॉनची लक्षणे प्रत्येकात वेगवेगळी असू शकतात, परंतु तरूणांमध्ये जास्त थकवा, अंगदुखी आणि डोकेदुखी याची लक्षणे आहेत. डेल्टा प्रमाणे या व्हेरिएंटमध्ये लोकांना चव आणि वास जानवत नाही. मात्र, काही लोकांच्या घशात खुप जास्त खवखव जाणवत आहे. (Omicron Symptoms in kids)

मुलांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका –
दक्षिण अफ्रीकामध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या मुलांची संख्या जास्त आहे. त्यांच्यात हलकी ते गंभीर लक्षणे दिसून येत आहेत. येथील ख्रिस हानी बरगवनाथ अकॅडमिक हॉस्पिटलच्या डॉक्टर रूडो मथिवा यांनी द सन ला सांगितले, आता येथे जी मुले येत आहेत. त्यांच्यात मध्यम ते गंभीर लक्षणे दिसून येत आहेत.

 

त्यांना ऑक्सीजन, सपोर्टिव्ह थेरेपी आणि जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये राहण्याची आवश्यकता पडत आहे. ते पहिल्यापेक्षा जास्त आजारी पडत आहेत.

 

मुलांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटची लक्षणे (Omicron symptoms in kids) –

अमेरिकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) नुसार मुलांमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची काही विशेष लक्षणे दिसून येत आहेत. जसे की…

1. जास्त ताप

2. सतत खोकला येणे (एक तासापर्यंत सतत)

3. थकवा

4. डोकेदुखी

5. घशात खवखव

6. भूक न लागणे.

 

दक्षिण अफ्रीकेच्या हॉस्पिटल्समध्ये कोरोनाच्या तरुण रुग्णांमध्ये आणि मुलांच्या संख्येत वेगाने वाढ झाली आहे. विशेषता 5 वर्षाच्या छोट्या मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची जास्त गरज पडत आहे.

 

याचे कारण हे सुद्धा सांगितले जात आहे की, व्हॅक्सीन घेतलेली नसल्याने मुले या व्हेरिएंटच्या संसर्गाला सहजपणे बळी पडत आहेत.

 

Web Title :- Omicron Symptoms in kids | omicron variant common symptoms in kids rising cases in young

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sitaram Kunte | अनिल देशमुख प्रकरणात सीताराम कुंटेंची 6 तास चौकशी, जाणून घ्या नेमकं काय झालं?

Pune Corporation | शहरातील अनाधिकृत बॅनर अन् झेंड्यांबाबत पुणे महापालिकेचा मोठा निर्णय !

Bombay High Court | ‘…तुमच्याविरोधात कारवाई का करु नये?’ उच्च न्यायालयाचा नवाब मलिकांना सवाल

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News