Omicron Symptoms | पोटाशी संबंधीत आहे ओमिक्रॉनचे ‘हे’ लक्षण, आढळले तर व्हा सतर्क !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Omicron Symptoms | ओमिक्रॉन आता देशभर पसरला आहे. आरोग्य तज्ञ लोकांना जाळलीप च्या प्रत्येक लक्षणांबद्दल सांगत आहेत जेणेकरून त्यांना वेळेत ओळखता येईल. ओमिक्रॉनची लक्षणे (Omicron Symptoms) काही प्रकारे डेल्टा (Delta Covid Variant) पेक्षा वेगळी आहेत. मात्र, यामध्ये देखील काही लोकांना सर्दी-खोकला आणि घसा खवखवणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे, परंतु त्याची लक्षणे एवढ्यापुरती मर्यादित नाहीत. (Omicron Covid Variant)

 

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की श्वासोच्छवासाच्या संसर्गाव्यतिरिक्त, ओमिक्रॉनचा तुमच्या पोटावरही परिणाम होऊ शकतो. ओमिक्रॉनची लक्षणे पोटाशी संबंधित देखील आहेत.

 

 

पोटाशी संबंधित ओमिक्रॉनची लक्षणे (Omicron Stomach Related Symptoms) –

1. ताप नसतानाही जर उलट्या, मळमळ आणि पोटदुखी यासारख्या समस्या असतील, तर तज्ज्ञांच्या मते, हा ओमिक्रॉन संसर्ग असू शकते.

2. जर श्वासोच्छवासाच्या लक्षणांशिवाय किंवा तापाशिवाय पोटाचा त्रास होत असेल, तर उशीर न करता कोरोनाची चाचणी करून घ्यावी.

3. पोटदुखीची समस्या बहुतांशी लोकांमध्ये नव्याने आढळून येत आहे. लसीकरण झालेल्या लोकांमध्ये सुद्धा हे लक्षणे आढळून येत आहे.

4. कोविड-19 च्या काही नवीन लक्षणांमध्ये मळमळ, पोटदुखी, उलट्या, भूक न लागणे आणि अतिसार यांसारख्या लक्षणांचा समावेश होतो. (Omicron Symptoms)

 

 

तज्ज्ञ काय म्हणतात-
गुडगाव येथील फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक मनोज गोयल यांनी सांगितले की, काही लोकांना सुरुवातीला सर्दीशिवाय फक्त ओटीपोटात अस्वस्थता जाणवू शकते. यामध्ये पाठदुखी, पोटदुखी, मळमळ, उलट्या, भूक न लागणे आणि जुलाब यांसारख्या लक्षणांचा समावेश होतो.

 

 

ओमिक्रॉनमुळे पोटाच्या पातळ आवरणाला संसर्ग होतो आणि त्यामुळे सूज येते. तज्ञांचे म्हणणे आहे की ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना देखील पोटाशी संबंधित समस्या होत आहेत. ही लक्षणे गंभीर नाहीत आणि काळजी करण्यासारखे काही नाही.

 

 

 

बेफिकीर राहू नका
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सामान्य फ्लूप्रमाणे पोटदुखी, मळमळ आणि भूक न लागणे ही लक्षणे दिसत असतील तर लगेच स्वतःला आयसोलेट करा.

डॉक्टरांशिवाय स्वत: कोणतेही औषध घेऊ नका.

स्वतःला हायड्रेटेड ठेवा.

हलके अन्न खा आणि पुरेशी झोप घ्या.

मसालेदार अन्न आणि अल्कोहोलपासून दूर राहा.

डॉक्टरांच्या मते, सौम्य लक्षणांमध्ये घाबरण्याची गरज नाही.

 

 

लक्षणे दिसताच या गोष्टी करा-
ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांनी स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी.

या लोकांनी ताजे अन्न सेवन करावे.

अन्न शेअर करणे टाळा.

खाण्यापूर्वी सर्व फळे नीट धुवावीत.

बाहेरचे अन्न खाणे टाळा

लसीकरण केले असले तरीही कोविड सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करा.

आयसोलेट कालावधी संपल्यानंतरच तुमची खोली सोडा.

 

 

Web Title :- Omicron Symptoms | omicron Covid Variant can affect your gut stomach related symptoms diarrhoea warning sign to watch out for

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

LIC Jeevan Labh Yojana | 252 रुपयांच्या गुंतवणुकीवर LIC ची ही योजना तुम्हाला देईल 20 लाखाची रक्कम, केवळ इतकी वर्षे करावी लागेल प्रतीक्षा

 

Crime News | धक्कादायक ! मुलगी जिवंत होईल म्हणून आई-वडिलांनी 2 महिने घरातच ठेवला मृतदेह

 

Coronavirus in Pune | पुणेकरांनो मुलांची विशेष काळजी घ्या ! आठवडयाभरातील धक्कादायक आकडेवारी आली समोर