Omicron Variant | नवीन कोविड व्हेरिएंट Omicron चे पहिले छायाचित्र जारी Delta पेक्षा जास्त म्यूटेशन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Omicron Variant | दक्षिण अफ्रीकेत सापडलेला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमीक्रोन (Omicron Variant) चे पहिले छायाचित्र समोर आले आहे. ज्यावरून समजते की, ओमीक्रोनमध्ये कोरोनाच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत जास्त म्यूटेनशन आहे. इटलीची राजधानी रोम येथील बम्बिनो गेसु हॉस्पिटलने (Bambino Gesu hospital) छायाचित्राच्या आधारावर ही माहिती दिली आहे.

 

किती घातक, अद्याप समलेले नाही

 

26 नोव्हेंबरला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोविड व्हेरिएंट बी.1.1.529 ला ’ओमीक्रोन’ नाव देत त्यास ’व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ जाहीर केले होते.
मात्र, जगभरात खळबळ उडवून दिलेला हा व्हेरिएंट किती जास्त संसर्गजन्य आणि घातक आहे, हे अद्याप समजलेले नाही.

 

डेल्टाच्या तुलनेत जास्त म्यूटेशन्स

 

संशोधन करणार्‍या टीमने सांगितले की, आपण स्पष्टपणे पाहू शकतो की, ओमीक्रोन व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत जास्त म्यूटेशन्स आहे.
हा प्रोटीनच्या एका क्षेत्रात सर्वात वर केंद्रित आहे, जो मानवी पेशींसोबत इंटरेक्ट करते. याचा हा अर्थ नाही की, तो जास्त धोकादायक आहे.
व्हायरसने केवळ आणखी एक प्रकार उत्पन्न करून मानवी जातीला आणखी अनुकूल बनला आहे.

 

WHO ने हे केले स्पष्ट

 

इकडे WHO ने एक अपडेट रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, हे स्पष्ट नाही की, डेल्टासह इतर व्हेरिएंटच्या तुलनेत ओमिक्रोन जास्त संसर्गजन्य म्हणजे ट्रान्समिसिबल (एका व्यक्तीतून दुसर्‍या व्यक्तीमध्ये जास्त सहजपणे पसरणारा) आहे किंवा किती वेगाने पसरतो.

 

दक्षिण अफ्रीकेत का वाढली संख्या

 

सुरुवातीचे आकडे सांगतात की, दक्षिण अफ्रीकेत हॉस्पिटलमध्ये भरती होणार्‍यांची संख्या वाढली आहे परंतु ही विशेषप्रकारे ’ओमीक्रोन’ मुळे नव्हे तर संक्रमित होणार्‍या लोकांच्या एकुण संख्येत वाढीमुळे वाढलेली असू शकते. WHO ने म्हटले, ओमीक्रोन व्हेरिएंटच्या (Omicron Variant) गंभीरतेचा स्तर समजण्यास अनेक दिवसांपासून अनेक आठवडे लागतील.

 

शास्त्रज्ञांचे रात्रंदिवस प्रयत्न

 

नवीन व्हेरिएंटबाबत जाणून घेण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत.
कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची पहिली केस 24 नोव्हेंबर 2021 ला दक्षिण अफ्रीकेत सापडली होती.

 

या देशांमध्ये सापडला व्हेरिएंट

 

दक्षिण अफ्रीकेशिवाय यूनायटेड किंगडम, जर्मनी, इटली, बेल्जियम, बोत्सवाना, हाँगकाँग आणि इस्त्रायलमध्ये सुद्धा हा व्हेरिएंट सापडला होता.
हा व्हेरिएंट समोर आल्यानंतर जगातील अनेक देशांनी दक्षिण अफ्रीकेतून येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांवर प्रतिबंध लावला आहे.

 

Web Title : Omicron Variant | first picture of new covid variant omicron released more mutations than delta

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Winter session 2021 | राज्यसभेत गोंधळ घालणार्‍या 12 खासदारांचं निलंबन; काँग्रेससह शिवसेनेच्या दोघांचा समावेश

Bigg Boss 15 | तेजस्वी प्रकाश आणि करणा कुंद्राच्या नात्यावर राखीचा पति रितेशने उपस्थित केले प्रश्न, म्हणाला…

Parambir Singh and Sachin Vaze | परमबीर आणि वाझे यांच्यात त्यावेळी केबिनमध्ये तासभर चर्चा; मुंबई पोलिस चौकशी करणार