Omicron Variant in Maharashtra | ‘…तरच महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय होईल’; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Omicron variant in Maharashtra | दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने (Omicron variant) जगाची चिंता वाढली आहे. याचबरोबर भारतातील काही राज्यात या भयावह विषाणूने शिरकाव केल्याने प्रशासनाची धांदल उडाली आहे. महाराष्ट्रात दोन दिवसात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण (Omicron variant in Maharashtra) सापडले आहेत. पहिला रुग्ण डोंबिवलीत सापडला तर नंतर पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये 7 जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली. यामुळे महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) अलर्ट झालं आहे. या पार्श्वभुमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले की, ‘ओमायक्रोनची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकार (Maharashtra Government) अलर्ट झाले असले तरी लगेच निर्बंध लावणे लोकांसाठी जाचक आणि कठीण असू शकतं. यासंदर्भात परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तसेच, परदेशातून आलेल्या 100 टक्के प्रवाशांचे स्क्रिनिंग केलं जात आहे. राज्यात जनुकीय तपासणी अर्थात जीनोमिक सिक्वेन्स तपासल्या जाणाऱ्या लॅब वाढवणार असून नागपूर आणि औरंगाबाद मध्ये नवीन लॅबची निर्मिती करण्यात येणार आहेत. असं ते म्हणाले. (Omicron Variant in Maharashtra)

पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले, ‘राज्यात लगेच निर्बंध लावणे लोकांसाठी जाचक आणि कठीण होईल,
परिस्थिती पाहून व त्यावर लक्ष ठेवून, टास्क फोर्स, मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारशी चर्चा करुनच लॉकडाऊनचा निर्णय होईल,
तसेच राजकीय बैठका, मेळाव्याच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन केले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

 

Web Title :- Omicron Variant in Maharashtra | decision lockdown will be taken only after discussions cm uddhav thackeray task force and central govt

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Aba Bagul | मिळकत कराच्या अभय योजनेला काँग्रेसचा विरोध, काँग्रेस नेते आबा बागूल यांचा सत्ताधारी आणि प्रशासनावर हल्लाबोल

Online Instant Loan घेण्यात महत्वाची आहे आधार कार्डची भूमिका, सहज होते e-KYC ची प्रक्रिया पूर्ण 

Jacqueline Fernandez | महाठग चंद्रशेखरचे धक्कादायक खुलासे ! जॅकलीनला 52 लाखांचा घोडा आणि 9 लाखांची मांजर दिली भेट, तर नोराला…

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 17 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

ITR Filing Rules For Senior Citizen | 75 वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांना भरावा लागणार नाही आयटीआर, जाणून घ्या नियम