Omicron Variant | चिंतेत भर! राज्यात आणखी 20 ओमिक्रॉन रुग्णांची भर, पुण्यातील 6 रुग्णांचा समावेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची (Coronavirus in Maharashtra) संख्या नियंत्रणात आली असतानाच ओमिक्रॉन व्हेरियंटचे (Omicron variant) रुग्ण आढळून आले. राज्यात ओमिक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून या व्हेरियंटचे संकट अधिकच गडद होत चालले आहे. राज्यात गुरुवारी (दि.23) ओमिक्रॉनचे 23 रुग्ण आढळून आले होते. तर आज (शुक्रवार) 20 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण (Omicron variant) वाढत असल्याने राज्य सरकारने (State Government) कठोर निर्णय घेतले आहेत.

 

आज राज्यात ओमिक्रॉन व्हेरियंटचे (Omicron variant) 20 रुग्ण आढळले आहेत. यातील 14 रुग्ण राष्ट्रीय विषाणू संस्था (National Institute of Virology) तर 6 रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (Indian Institute of Science Education and Research) केलेल्या चाचणीत आढळून आले आहेत. आज राज्यात सापडलेल्या रुग्णांपैकी 6 रुग्ण पुण्यातील (Pune), तर मुंबईतील (Mumbai) 11 रुग्ण, 2 सातारा (Satara) आणि अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar district) 1 रुग्ण सापडला आहे. त्यामुळे राज्यात आज सापडलेल्या रुग्णांमुळं ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 108 झाली आहे. त्यापैकी 54 रुग्ण बरे झाले आहेत.

आज सापडलेल्या रुग्णांपैकी 20 रुग्ण हे 15 आंतरराष्ट्रीय (International) प्रवासी तर 1 आंतरदेशीय प्रवासी तर 4 जण त्यांचे निकटवर्तीय आहेत. यातील एक रुग्ण 18 वर्षाखालील बालक आहे तर 6 जण 60 वर्षावरील आहेत. 12 रुग्णांचे पूर्ण लसीकरण (Vaccination) झाले आहे. तर 7 रुग्णांचे लसीकरण झालेले नाही तर 1 रुग्ण लसीकरणासाठी पात्र नाही.

 

Web Title :- Omicron variant | maharashtra reports 20 new omicron cases in maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Omicron Variant Symptoms | सर्दी-ताप आल्यास नका करू दुर्लक्ष; ‘हे’ आहेत ओमायक्रॉनची 2 भिन्न लक्षणे, जाणून घ्या

Bombay High Court | डीएसके यांचे जावई केदार वांजपे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’ रुग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासात 1410 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Omicron Restrictions Maharashtra | राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू ! रात्री ‘या’ वेळेत जमावबंदी; सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध, जाणून घ्या नवीन नियमावली

 

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील मिळकतींची करपात्र रक्कम निश्‍चित करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

Pune Crime | पिंपरी-चिंचवडच्या ‘सासु’ विभागाकडून 1 लाखाचा गुटखा जप्त; एकाला अटक अन् पुण्याच्या रास्ता पेठेतील बडा डिलर मिथुन नवलेविरूध्द गुन्हा दाखल