Omicron Variant | ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंट ‘डेल्टा’पेक्षा 6 पट घातक, ‘या’ 6 लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोनाच्या व्हायरसच्या नव्या (Coronavirus New Variant) ओमिक्रॉन व्हेरिएंटने (Omicron Variant) संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) पूर्वीच्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत 6 पट अधिक घातक आहे. व्हेरिएंटच्या म्युटेशनचा वेग (mutation speed) काळजी वाढवणार आहे. आफ्रिका खंडातील देशांमध्ये या व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे युरोपियन युनियन (European Union), अमेरिका (USA), इस्त्राइल (Israel), ऑस्ट्रेलिया (Australia), कॅनडासह (Canada) इतर देशांनी आफ्रिकेतून सुरु असलेली वाहतूक रोखली आहे.

 

ओमिक्रॉन व्हेरिएंटबद्दल (Omicron Variant) जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) चिंता व्यक्त केली आहे.
या व्हेरिएंटवर मोनोक्लोनल एँटीबॉडीज थेरेपीचा (monoclonal antibody therapy) कोणताही परिणाम होत नाही.
या व्हेरिएंटचा धोका नेमका किती आणि त्याची लक्षणं काय याबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे.

 

दक्षिण आफ्रिकेसह काही देशांत ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉन 6 पट अधिक शक्तिशाली आहे.
डेल्टा व्हेरिएंटमुळेच (Delta variant) भारतात कोरोनाची दुसरी लाट आली होती. या लाटेत देशात दररोज विक्रमी 4 लाख रुग्ण आढळून आले होते.

 

न्यूयॉर्क टाईम्सने म्हटलं आहे की, ओमिक्रॉन व्हेरिएंट आधीच्या व्हेरिएंटपेक्षा जास्त संक्रामक असून तो लसीकरणामुळे तयार होणारी रोगप्रतिकारशक्ती (Immunity) निष्प्रभ करु शकतो.
डेल्टा व्हेरिएंट विरोधात मोनोक्लोनल अँटीबॉडीज थेरेपी उपयोगी ठरत होती. परंतु डेल्टा प्लस विरोधात ती निरुपयोगी ठरली.
ओमिक्रॉन व्हेरिएंट बद्दल असेच दिसून येत आहे.

 

नव्या व्हेरिएंटची लक्षणं

 

ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) कोणत्याही प्रमुख सिंड्रोम शिवाय (syndrome) हलक्या आजाराचं कारण ठरत असल्याची माहिती दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) तज्ज्ञांनी दिली आहे.
नव्या व्हेरिएंटमुळे हलक्या स्वरूपाचा त्रास होतो. मांसपेशींमध्ये वेदना (Muscle pain), एक दिवस थकवा किंवा दोन दिवस ताप अशी लक्षण दिसून येतात.
आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांना वास येणं बंद होत होतं. परंतु या नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्यांना त्रास होत नाही.
त्यांना हल्का कफ जाणवतो, अशी माहिती दक्षिण आफ्रिका मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष अँजेलिक कोएट्रीजी (Angelique Coetrigi) यांनी दिली.

 

नव्या व्हेरिएंटचा कोणाला धोका ?

 

नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्यांची संख्या जास्त नाही. अनेक ओमिक्रॉनग्रस्त घरामध्येच उपचार घेत आहेत.
त्यामुळे रुग्णालयांवर फारसा ताण आलेला नाही. या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वेगाने वाढण्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
यासंदर्भात माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे.
रुग्णालयात दाखल झालेले बहुतांश रुग्ण हे तरुण आहेत. त्यांचे वय 40 पेक्षा कमी आहे, असं कोएट्रजी यांनी सांगितले.

 

Web Title : Omicron Variant | new coronavirus news omicron 6 times more transmissible delta variant know about symptoms know in details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Parambir Singh | परमबीर सिंह यांना मोठा दिलासा; पण, सुनावला दंड

Omicron Variant | ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर आज फेरविचार?

Crude Oil Prices | कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनचा प्रभाव, LPG सिलेंडरपासून पेट्रोल-डिझेलपर्यंत होऊ शकते स्वस्त