Omicron Variant | चिंताजनक ! मुंबईत ओमिक्रॉनचा उद्रेक, एकाच दिवसात आढळले तब्बल 27 रुग्ण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron Variant) राज्यात हळूहळू हातपाय पसरवू लागला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहे. मात्र आता मुंबई (Mumbai) हे ओमिक्रॉन व्हेरिएंटचे (Omicron Variant) हॉटस्पॉट (Hotspot) ठरले आहे. आज (रविवार) मुंबईत एकाच दिवसात तब्बल 27 रुग्ण आढळून आले आहेत. तर ठाण्यात 2, पुणे ग्रामीण (Pune Rural) आणि अकोल्यात (Akola) एक रुग्ण आढळून आला आहे. राज्यात ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 141 वर पोहोचली आहे.

 

मुंबई महापालिकेकडून शहरातील कोरोना परिस्थिती आणि रुग्णांबद्दल माहिती दिली आहे. राज्यात आज एकूण 31 ओमिक्रॉनचे (Omicron Variant) रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत एकाच दिवसात 27 रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईत आढळून आलेल्या 27 रुग्णांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश आहे.

 

मुंबईत आढळून आलेले सर्व रुग्ण परदेशातून (Abroad) आले आहेत. त्यातील 15 जण हे मुंबई बाहेरील रहिवासी आहेत. 21 रुग्णांची मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) तपासणी करण्यात आली होती. रोपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्व रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या 27 पैकी 8 जणांनी कोविडची कोणतीही लस (Covid vaccine) घेतली नाही. तर 7,8 आणि 9 वर्षाच्या तीन मुलांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. तर दुसरीकडे राज्यात 1648 कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्ण आढळून आले असून 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

विदर्भात (Vidarbha) ओमिक्रॉनने शिरकाव केला आहे. अकोल्यात आज ओमिक्रॉनचा एक रुग्ण आढळून आला आहे. 18 डिसेंबर रोजी दाखल झालेल्या एका कोरोनाबाधित महिलेची ओमिक्रॉन चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने (Government Medical College) दिली आहे. ही महिला दुबई (Dubai) येथून प्रवास करुन आली होती.

 

Web Title :- Omicron Variant | omaicron out breck in mumbai 27 found positive in a single day

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’ रुग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासात 1648 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

PM Kisan Yojana | 5 दिवसानंतर PM मोदी कोट्यवधी शेतकर्‍यांना देणार खुशखबर ! खात्यात येतील 4000 रुपये, लवकर करा ‘हे’ काम अन्यथा रखडू शकतो हप्ता

Gold Price Today | सोन्याच्या किमतीत घसरणीने खरेदीदारांच्या चेहर्‍यांवर समाधान, जाणून घ्या आठवडाभरातील सोने-चांदीची स्थिती

Bathroom Stroke | हिवाळ्यात येणाऱ्या बाथरूम स्ट्रोकबद्दल तुम्हाला माहिती आहे?, जाणून घ्या कशी घ्यावी खबरदारी