Omicron Variant | भारतात आज मध्यरात्रीपासून प्रवाशांसाठी नवे नियम लागू, जाणून घ्या नवीन नियमावली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोन (Omicron Variant) हा अत्यंत जलद गतीने जगभरातील अनेक देशांत पोहचला आहे. हा विषाणू आधीच्या डेल्टा प्लस (Delta Plus) विषाणूपेक्षा जास्त घातक असल्याचे बोलले जात आहे. भारतात ओमायक्रोन (Omicron Variant) विषाणूने बाधित असलेला एकही रुग्ण अद्याप सापडलेला नाही. मात्र, हवाई आणि जल वाहतुकीने प्रवास करुन येणाऱ्या प्रवाशांमुळे कदाचित या विषाणूचा धोका उद्भवू शकतो. याच पार्श्वभूमीवर केंद्र  सरकार (Central Government) सतर्क झाले आहे.

 

केंद्र सरकारने ओमायक्रोन व्हेरिएंटचा (Omicron Varian)  धोका लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी (international travelers) प्रवासाच्या नियमावलीत बदल (Rules change) केले आहेत.
ही नियमावली केंद्र सरकारकडून जारी करण्यात आली आहे. ही नवी नियमावली आज (मंगळवार) मध्यरात्रीपासून देशभरात लागू होणार आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandvia) यांनी याबाबत आज संसदेत माहिती दिली.

 

ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता सर्व विमानतळ (Airport) आणि बंदरांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
कुणी संशयित आढळल्यास तातडीने जीनो सीक्वेंसिंग (Geno sequencing) केली जात असल्याची माहिती मनसुख मांडविया यांनी दिली.
तसेच केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना टेस्टिंग वाढवण्याची, आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर कडक लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 

नवीन नियमावली

 

– ज्या देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे अशा देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट (RTPCR test) होईपर्यंत त्यांची विमानतळावर राहण्याची सुविधा करण्यात यावी.
प्रवाशांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला तर त्यांना 7 दिवस होम क्वारंटाईनमध्ये (Home quarantine) रहावे लागेल. त्यानतंर आठव्या दिवशी पुन्हा त्यांची टेस्ट केली जाईल.
राज्यातील अधिकारी अशा प्रवाशांच्या घरी जावून याबाबतची व्यवस्था करतील.

 

– ज्या प्रवाशाची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह येईल त्या प्रवाशाचे सॅम्पल जीनोम सिक्वेंसिंगसाठी आयएनएसएसीओजी प्रयोगशाळेत (INSACOG Laboratory) तातडीने पाठवावेत.
तसेच राज्यातील संक्रमित व्यक्तींची माहिती घ्यावी. याशिवाय 14 दिवस पूर्ण झाल्यानंतर देखील त्यांचा फॉलोअप घ्यावा.

 

– प्रत्येक राज्याने आपापल्या विमानतळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर कडक लक्ष ठेवावं.
आता पुन्हा टेस्ट, ट्रॅक, ट्रीट आणि वॅक्सिनेट या रणनितीवर जोर दिला जातोय.

 

– सर्व राज्यांना वेगाने टेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे. ओमायक्रोन विषाणूची ओळख आरटीपीसीआर किंवा रॅपिड अँटिजेन टेस्टमधून होऊ शकते.

 

– ज्या परिसरात मागच्या काही दिवसांमध्ये सर्वाधिक रुग्णवाढ होताना दिसत आहे अशा भागात सर्वाधिक लक्ष देण्याचे निर्देश सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत.

 

Web Title : Omicron Variant | omicron covid variant indias new travel guidelines

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government | एअर इंडियानंतर आता आणखी एक सरकारी कंपनी विक्रीस; केंद्र सरकारची मंजुरी

Punit Pathak | प्रसिद्ध कोरियोग्राफरने पहिल्यांदा पत्नीला झोपेतून उठवलं अन् झाला रोमँटीक, बेडरुम व्हिडीओ झाला व्हायरल

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 942 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी