चिंताजनक ! राज्यात Omicron Variant चा उद्रेक, देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा (Coronavirus) नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron Variant) राज्यात आपले हातपाय पसरत चालला आहे. दिवसेंदिवस ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज राज्यात 26 ओमिक्रॉन बाधित (Omicron Variant) रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक मुंबईत (Mumbai) 11 रुग्ण आढळून आले आहेत. तर नांदेडमध्ये (Nanded) 2 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 167 इतकी झाली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 26 नवीन ओमिक्रॉन बाधित (Omicron Variant) रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये मुंबई-11, रायगड (Raigad)-5, ठाणे (Thane)-4 आणि नांदेड 2 रुग्ण आढळून आले आहेत. तर नागपूर, भिवंडी, पालघर आणि पुणे ग्रामीणमध्ये (Pune Rural) प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद मुंबईत झाली आहे. मुंबई ओमिक्रॉन व्हेरिएंटचा हॉटस्पॉट (Hotspot) बनत आहे. मुंबईत आजपर्यंत 84 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये 19 आणि पुणे ग्रामीणमध्ये 17 रुग्ण आढळून आले आहेत. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 14 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश. यापैकी 19 जणांचे लसीकरण झाले आहे तर 3 जणांनी लस घेतलेली नाही तर 4 लहान मुले आहेत. राज्यात आजपर्यंत 72 ओमिक्रॉन बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

 

Web Title :- Omicron Variant | Omicron outbreak in the maharashtra the number of patients reached 167

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1426 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

ना मिनिमम बॅलन्सचे झंझट, ना लागणार चार्ज ! जाणून घ्या कसे उघडायचे Jio Payments Bank Account आणि काय आहेत याचे फायदे?

Property Tax Pune | पाच वर्षात पाणीपट्टी 100 टक्क्यांनी वाढली; परंतू पुणेकरांना अद्याप ‘चोवीस तास’ पाणी पुरवठा नाही; मिळकत करामध्ये 11 टक्के वाढीचा प्रशासनाचा प्रस्ताव