Omicron Variant | ‘कोरोना’चा नवा व्हेरिएंट ‘ओमिक्रॉन’चा सर्वाधिक धोका कोणाला? समोर आली महत्त्वाची माहिती

जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था – Omicron Variant | कोरोनाच्या व्हायरसच्या नव्या (Coronavirus New Variant) ओमिक्रॉन व्हेरिएंटने (Omicron Variant) संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) पूर्वीच्या व्हेरिएंटच्या तुलनेत 30 पट अधिक वेगाने पसरतो. व्हेरिएंटच्या म्युटेशनचा वेग (mutation speed) काळजी वाढवणार आहे. आफ्रिका खंडातील देशांमध्ये या व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे युरोपियन युनियन (European Union), अमेरिका (USA), इस्त्राइल (Israel), ऑस्ट्रेलिया (Australia), कॅनडासह (Canada) इतर देशांनी आफ्रिकेतून सुरु असलेली वाहतूक रोखली आहे.

 

नव्या व्हेरिएंटची लक्षणं
ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant)) कोणत्याही प्रमुख सिंड्रोम शिवाय (syndrome) हलक्या आजाराचं कारण ठरत असल्याची माहिती दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) तज्ज्ञांनी दिली आहे. नव्या व्हेरिएंटमुळे हलक्या स्वरुपाचा त्रास होतो. मांसपेशींमध्ये वेदना (Muscle pain), एक दिवस थकवा किंवा दोन दिवस ताप अशी लक्षण दिसून येतात. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांना वास येणं बंद होत होतं. परंतु या नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्यांना त्रास होत नाही. त्यांना हल्का कफ जाणवतो, अशी माहिती दक्षिण आफ्रिका मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा एँजेलिक कोएट्रीजी (Angelique Coetrigi) यांनी दिली.

नव्या व्हेरिएंटचा कोणाला धोका ?
नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्यांची संख्या जास्त नाही. अनेक ओमिक्रॉनग्रस्त घरामध्येच उपाचर घेत आहेत. त्यामुळे रुग्णालयांवर फारसा ताण आलेला नाही. या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वेगानं वाढण्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. यासंदर्भात माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. रुग्णालयात दाखल झालेले बहुतांश रुग्ण हे तरुण आहेत. त्यांचेवय 40 पेक्षा कमी आहे, असं कोएट्रजी यांनी सांगितले.

 

Web Title :- Omicron Variant | omicron variant causing mild illness says south african medical association marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bank Holidays in December | डिसेंबर 2021 मध्ये एकुण 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी पहा सुट्ट्यांची पूर्ण यादी

Pune Crime | पती-पत्नीतील भांडणात रस्त्यावरील वाहनांची केली तोडफोड; पुण्याच्या बोपोडीत जावयाचा ‘धिंगाणा’

Pune Crime | पुण्यात 16 वर्षीय मुलीवर बलात्कार ! प्रियकर आणि त्याच्या मित्राकडून ‘डर्टी पिक्चर’ व्हायरल; येरवडा पोलिसांकडून दोघांना अटक

Personal Finance | कामाची बातमी ! 1 डिसेंबरपासून होणार आहेत मोठे बदल, तुमच्या खिशावर वाढणार भार; जाणून घ्या

Pune Crime | पुण्यातील सहकारनगर पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप यांच्यासह दोघांवर FIR, प्रचंड खळबळ; जाणून घ्या प्रकरण