Omicron Variant | ’ओमिक्रॉन’ किती धोकादायक? सध्याची लस प्रभावी ठरेल का? कशी आहेत लक्षणं? WHO नं याबाबत केलं सावध, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Omicron Variant | कोरोना व्हायरसचा (Coronavirus) नवीन व्हेरिएंट बी.1.1.529 म्हणजे ’ओमिक्रॉन’ (Omicron Variant) संपूर्ण जगासाठी एक नवीन धोका बनत आहे. डब्ल्यूएचओने यास ’व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ जाहीर केले आहे. ओमिक्रॉन भारतात दुसर्‍या लाटेत विध्वंस करणार्‍या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा जास्त संसर्गजन्य असल्याचे सांगितले जात आहे. या चिंतेदरम्यान रविवारी WHO ने ओमिक्रॉनसंबंधी काही विशेष माहिती लोकांना दिली आहे.

 

रिइन्फेक्शनचा धोका (Omicron Reinfection) –
WHO नुसार, सुरुवातीचे आकडे सांगतात की, ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे लोकांमध्ये रिइन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. म्हणजे कोरोना व्हायरसने संक्रमित झालेले लोक सुद्धा या नवीन व्हेरिएंटच्या विळख्यात सापडू शकतात.

 

याबाबत अद्याप खुप कमी माहिती उपलब्ध आहे. अधिक माहिती मिळण्यास थोडा उशीर लागू शकतो. तोपर्यंत लोकांना सांभाळून राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

 

डेल्टापेक्षा जास्त संसर्गजन्य आहे किंवा नाही (Omicron Infectious) –
ओमिक्रॉन व्हेरिएंट कोरोनाच्या डेल्टा किंवा इतर व्हेरिएंटपेक्षा जास्त संसर्गजन्य आहे, याबाबत कोणताही ठोस दावा करता येऊ शकत नाही. म्हणजे मनुष्यांमध्ये हा व्हेरिएंट किती वेगाने पसरतो यावर स्पष्ट प्रतिक्रिया देणे अवघड आहे.

 

सध्या इतकीच माहिती आहे की, RT-PCR टेस्टने हा नवीन स्ट्रेन डिटेक्ट केला जाऊ शकतो. कोरोना व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनमध्ये या व्हेरिएंटमध्ये जवळपास 30 म्यूटेशन आहे. यासाठी लोकांमध्ये तो सहजपणे पसरण्याची शक्यता आहे. (Omicron Variant)

 

व्हॅक्सीनवर ओमिक्रॉनचा प्रभाव (Omicron Effect On Vaccine) –
ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका जाणवल्यानंतर WHO टेक्निकल पार्टनरसोबत व्हॅक्सीनवर या व्हेरिएंटचा प्रभाव समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून व्हॅक्सीनेट लोकांवर व्हेरिएंटचा प्रभाव दिसून येऊ शकतो.

 

कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटवर सध्याची व्हॅक्सीन प्रभावी आहे किंवा नाही याचा शोध घेण्यास सुद्धा शास्त्रज्ञांना थोडा वेळ लागू शकतो.

कशी आहेत लक्षणे (Symptoms Of Omicron) –
ओमिक्रॉनचा संसर्ग गंभीर प्रकारे एखाद्या मनुष्याला आजारी पाडू शकतो किंवा नाही, यावर स्पष्टपणे काहीही सांगता येत नाही.
ओमिक्रॉनची लक्षणे इतर व्हेरिएंटपेक्षा वेगळी असतील किंवा नाही, याची सुद्धा सध्या कोणतीही माहिती नाही.

 

दक्षिण अफ्रीकेत वाढली प्रकरणे –
प्राथमिक आकड्यांनुसार, दक्षिण अफ्रीकेच्या हॉस्पिटल्समध्ये रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.
परंतु हे एकट्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे नव्हे, तर संक्रमितांची एकुण संख्या वाढल्यामुळे सुद्धा होऊ शकते.

 

प्राथमिक संशोधनानुसार, तरूणांमध्ये याची हलकी लक्षणे दिसू शकतात.
परंतु ओमिक्रॉन व्हेरिएंटमध्ये गंभीरतेचा स्तर समजण्यासाठी आणखी काही दिवसांपासून काही आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.

 

Web Title :- Omicron Variant | omicron variant covid 19 infected may become reinfected easily who findings

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Anushka Sen | अनुष्का सेनची मालदीवमध्ये मस्ती ! बॅकलेस मोनोकनी आणि स्कूबा डायव्हिंग करत शेअर केले फोटो आणि व्हिडीओ

Sapna Chaudhary | सपना चौधरीच्या ‘या’ हरियाणवी गाण्याला मिळाले तब्बल 11 कोटींपेक्षा जास्त व्यूज, आईच्या भूमिकेमध्ये दिसली अभिनेत्री

Nikki Tamboli | बर्थडे पार्टीमध्ये निक्की तांबोलीचा बोल्ड ड्रेस पाहून चाहते म्हणाले – ‘ही लवकरच उर्फी जावेद…’