Omicron Variant | पुण्याच्या ग्रामीण भागात ओमायक्रॉनची ‘एन्ट्री’, जून्नरमध्ये 7 रुग्ण आढळले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेला कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने (Omicron Variant) महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, डोबिवली, नागपूर, लातूर या शहरांमध्ये रुग्ण आढळून आले होते. मात्र राज्यातील ग्रामीण भागात (rural area) आजपर्यंत ओमायक्रॉनच व्हेरियंटचे (Omicron Variant) रुग्ण आढळून आले नव्हते. पण आज पुण्याच्या (Pune) जुन्नर (Junnar) नारायणगाव-वारुळवाडी (Narayangaon-Warulwadi) येथे ओमायक्रॉन व्हेरियंटचे तब्बल 7 रुग्ण आढळून आले आहे. ग्रामीण भागात नव्या विषाणूने शिरकाव केल्याने नगारिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्याने पुणे महापालिकेसह (Pune Municipal Corporation) नगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे.

 

रुग्णांच्या संपर्कात 50 जण
नारायणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी वर्षा गुंजाळ (Medical Officer Varsha Gunjal) यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील हे सात रुग्ण पंधरा दिवसांपूर्वी दुबईवरुन (Dubai) आले होते. त्यानंतर मागच्या शनिवारी त्यांचा अहवाल पुण्याच्या एनआयव्ही (NIV) संस्थेकडे पाठवला होता. आज त्याचा रिपोर्ट आला आहे. हे सात रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह (Omicron Variant) आले आहेत. त्यांच्या संपर्कात 50 जण आले असून त्यांचे अहवाल एनआयव्हीकडे पाठवण्यात आले आहे. अद्याप त्यांचे अहवाल प्राप्त झाले नाहीत. सातही रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना नारायणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (Narayangaon Primary Health Center) कोव्हीड सेंटरमध्ये (Covid Center) ठेवण्यात आले आहे. (Omicron Variant)

कोरोना लाटेत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत जुन्नर तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट (Corona hotspot) ठरला होता.
ग्रामीण भागातील जुन्नरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते.
आता ओमायक्रॉनचे एकदम 7 रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशावेळी प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे सांगण्यात येत आहे.

 

Web Title :- Omicron Variant | omicrons covid variant rural pune too 7 infected new virus junnar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Corona | ग्रामीण भागात ओमायक्रॉनच्या एन्ट्रीने चिंता वाढली, पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 73 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘गेल्या 24 तासात कोरोना’च्या 902 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Anti Corruption Bureau Pune | पिंपरी चिंचवड महापालिकेतील 2 कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; खळबळ प्रचंड