ताज्या बातम्यामहत्वाच्या बातम्या

Omicron Variant | पुणेकरांची चिंता वाढली ! दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या व्यक्तीमध्ये ‘कोरोना’ची लक्षणं, रिपोर्टची प्रतीक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्यातील कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत असताना पुणेकरांची चिंता वाढणारी माहिती समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) ओमिक्रॉन व्हेरीएंटचा (Omicron Variant) धोका लक्षात संपूर्ण आरोग्य व्यवस्था परदेशातून येणाऱ्यंवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पुणे महापालिकेकडून (PMC) देखील परदेशातून येणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाते आहे. याच दरम्यान दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या एका व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं (Omicron Variant) आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. त्या व्यक्तीची चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे.

 

पुण्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असताना नव्या व्हेरिएंटमुळे (new variant) प्रशासनाची चिंता वाढली आहे.
महापालिका प्रशासनानेही तयारी सुरु केली असून राज्य सरकारकडून (Maharashtra Government) यासंदर्भात मार्गदर्शक सूचना (Guidelines) महापालिका प्रशासनाला मिळालेल्या आहे.
कोरोना कमी होत असल्याने पुणेकरांनी आणि आरोग्य यंत्रणांनी सुटकेचा श्वास टाकला असतानाच नव्य व्हेरीएंटमुळे चिंता वाढली आहे.

 

ओमिक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron variant) धोका जगभरात निर्माण झाला असून केंद्राने राज्य सरकारला योग्य ती सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महापालिका आरोग्य विभागही कामाला लागला आहे. शहरात मागील काही दिवसांत परदेशातून खासकरुन दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग,
ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे, जर्मनी, इस्रायल या देशातून कोणी नागरिक आले आहेत का याची माहीत संकलीत केली जात आहे.
एक नागरिक पंधरा दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आला आहे.

 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने या नागरिकाचा शोध घेतला असून त्याला कोरोनाची लक्षणं असल्याचे आढळून आले आहे.
त्यामुळे त्याची चाचणी करण्यात आली आहे. ती व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्यास त्याला ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे की कसे याची चाचणी केली जाणार असल्याचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे (Assistant Health Officer Dr. Sanjeev Wavre) यांनी दिली. सध्या हा व्यक्ती क्वारंटाईनमध्ये आहे.

संबंधित देशातून पुण्यात थेट विमान सेवा नसल्याने आंतरराष्ट्रीय विमानतळ (International Airport) असलेल्या भारतातील शहरातून पुण्यात आलेल्या व्यक्तींची माहिती गोळा केली जात आहे.
सध्या कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी हा संसर्गातील चढ-उतार असावा, असा अंदाज वावरे यांनी व्यक्त केला आहे.
तसेच महापालिकेची आरोग्य यंत्रणा कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title : Omicron Variant | pune man who returned from south africa founds corona symptoms reports awaited

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Excise Duty On Petrol-Diesel | 1 लीटर पेट्रोल-डिझेलमधून किती कमाई करते सरकार? संसदेत मोदी सरकारने दिले उत्तर

Pune School Reopen | पुण्यातील पहिली ते सातवीच्या शाळा 1 डिसेंबरला नाही तर ‘या’ तारखेला सुरु होतील, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून माहिती

Parbhani Crime | झोपेतच मृत्यूने गाठलं ! घरावर उसाची ट्रॉली पडून महिलेचा मृत्यू, 8 वर्षाची नात गंभीर जखमी 

Back to top button