Omicron Variant Symptoms | सर्दी-ताप आल्यास नका करू दुर्लक्ष; ‘हे’ आहेत ओमायक्रॉनची 2 भिन्न लक्षणे, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Omicron Variant Symptoms | कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने नागरीकांना चिंतेत टाकलं आहे. दरम्यान हा नवा ओमायक्रॉन विषाणूची नेमकी लक्षणे (Omicron Variant Symptoms) काय आहेत? हे जाणने महत्वाचे आहे. मागील कोरोनाच्या महामारीत नागरीकांना सर्दी-खोकला आणि ताप असे प्रामुख्याने लक्षणे आढळून आले. सध्या थंडीच्या मोसमामध्ये देखील बहुतेकांना हा त्रास होतो. तर, ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमध्ये त्याची लक्षणे ओळखणेही महत्त्वाचे असणार आहे.

 

ओमायक्रॉनची 2 लक्षणे (Omicron Variant Symptoms) सामान्य सर्दीपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. त्यांची ओळख करून घेतल्यास या नवीन प्रकाराचा संसर्गावर वेळीच उपाययोजना करता येऊ शकते. असं आरोग्य तज्ज्ञांकडून (Health expert) सांगण्यात आलं आहे.

 

काय आहेत ओमायक्रॉनची 2 असामान्य लक्षणे?
तज्ज्ञांच्या मतानूसार, त्याची लक्षणे कोरोनाच्या मूळ स्ट्रेनपेक्षा वेगळी आहेत. तर, वेगवेगळ्या प्रकारांमध्ये भिन्न लक्षणे असणे सामान्य आहे. ओमायक्रॉनच्या (Omicron variant) बाबतीतही असेच आहे. ओमायक्रॉनची लक्षणे सर्दीच्या लक्षणांसारखीच असतात, परंतु डोकेदुखी आणि थकवा या 2 वेगळ्या लक्षणांनी हळूहळू सुरुवात होते. असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ओमिक्रॉनची अन्य सामान्य लक्षणे कोणती?
नवीन प्रकार मागीलपेक्षा तिप्पट संसर्गजन्य आहे आणि अधिकाधिक नागरीकांना संक्रमित करू शकतो.
हा विषाणू लस आणि नैसर्गिक संसर्गापासूनही प्रतिकारशक्ती टाळू शकतो. आजपर्यंतच्या आकडेवारीनुसार,
ओमायक्रॉनची लक्षणे डेल्टासारखी गंभीर नाहीत. ओमिक्रॉनच्या काही सामान्य लक्षणांमध्ये सौम्य तापाचा समावेश होतो, जो आपोआप निघून जातो.
याशिवाय थकवा, घसा खवखवणे आणि तीव्र अंगदुखी ही ओमायक्रॉनची लक्षणे आहेत. खरंतर, ओमायक्रॉनमध्ये चव आणि सुगंध कमी होणे यासारखी लक्षणे दिसून येत नाहीत. असं WHO चं म्हणनं आहे.

 

ओमिक्रॉनपासून संरक्षण कसे करावे?
कोरोनाचे कोणतेही प्रकार टाळण्यासाठी लसीचे दोन्ही डोस (Corona vaccination) घेणे फार महत्वाचे आहे.
कोणत्याही (नवीन वर्ष) सेलिब्रेशनमध्ये स्वतःला गर्दीपासून दूर ठेवा आणि सामाजिक अंतरचे पूर्णपणे पालन करा.
मास्क व्यवस्थित लावा आणि आवश्यक असल्याशिवाय तो अजिबात काढू नका.
आपले हात वेळोवेळी स्वच्छ ठेवा आणि काही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा. असं सांगण्यात आलं आहे.

 

Web Title :- Omicron Variant Symptoms | two uncommon signs omicron see other common symptoms omicron other flue

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’ रुग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासात 1410 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 65 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Bombay High Court | डीएसके यांचे जावई केदार वांजपे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा