Omicron Variant | ओमिक्राॅन व्हेरिएंटमुळे चिंतेत भर ! दक्षिण आफ्रिकेतून किती प्रवासी मुंबईत आले? आदित्य ठाकरे म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Omicron Variant | दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळलेल्या कोरोनाच्या ओमिक्राॅन व्हेरिएंटमुळे (Omicron Variant) आता लोकांना धास्ती लागली आहे. या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने (Central Government) सर्व राज्यांना सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत. यामुळे राज्य सरकारनेही (Maharashtra Government) नियमावली जाहीर केली आहे. आफ्रिकेतून प्रवासांची ये-जा होत आहे. त्यामुळे भारतात येणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. सध्या विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांना 14 दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवलं जातंय. मात्र, गेल्या 20 दिवसांतही आफ्रिकेतून भारतात दाखल झालेल्यांची संख्या मोठी आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढलीय.

 

दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची माहिती राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिली आहे. 10 नोव्हेंबरपासून 1 हजार प्रवासी आफ्रिकेतून मुंबईत दाखल झाल्याची आकडेवारी त्यांनी सांगितली. दक्षिण आफ्रिकेतून दाखल झालेल्या हजार प्रवाशांपैकी किती जण मुंबईत आहेत, किती जण शहराबाहेर गेले, ते कोणाच्या संपर्कात आले, याचा शोध आता घेतला जाणार आहे. त्यासंदर्भातील माहिती गोळा करण्याचं काम सुरू झालं आहे. वीस दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात दाखल झालेल्यांची संख्या मोठी आहे. या आकडेवारीमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडलीय. (Omicron Variant)

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळलेल्या ओमिक्राॅन व्हेरिएंटमुळे (Omicron variant) भारताला चिंता लागली आहे.
दरम्यान, या आजाराबाबत डॉ. एँजेलिक कोएत्जी (Dr. Angelique Coetzee) यांनी माहिती दिलीय की,
आतापर्यंत ओमिक्राॅनची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये अतिशय सौम्य लक्षणं आढळून आलं आहे.
डॉक्टर एँजेलिक कोएत्जी यांनी ओमिक्राॅन व्हेरिएंट शोधून काढला आहे.
ओमिक्राॅनची लक्षणं सर्वप्रथम एका 30 वर्षीय तरुणामध्ये आढळून आल्याचं त्यांनी सांगितलं.
तसेच, त्याला प्रचंड थकवा जाणवत होता. त्याला काही प्रमाणात डोकेदुखीचा त्रास होता. संपूर्ण शरीरात वेदना जाणवत होत्या, अशी माहिती कोएत्जी यांनी दिली आहे.

 

Web Title :- Omicron Variant | thousand travelers arrived mumbai 10th november south africa says aditya thackeray coronavirus news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | सरकारने DA कॅलक्युलेशनमध्ये केला बदल, जाणून घ्या कसं करावं नवीन पगाराचा ‘हिशोब’

Bigg Boss 15 | ‘लग्न करुन पळून गेला’, पतिवर आरोप होताच राखीने करण कुंद्राला दिलं कडाडून उत्तर, म्हणाली…

Winter session 2021 | राज्यसभेत गोंधळ घालणार्‍या 12 खासदारांचं निलंबन; काँग्रेससह शिवसेनेच्या दोघांचा समावेश

Maharashtra Cabinet Decision | महानगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ