आखिल भारतीय क्षत्रीय महासभेच्या कंधार तालुकाध्यक्ष पदी ओमसिंग ठाकुर यांची निवड

कंधार : पोलीसनामा ऑनलाइन – अखिल भारतीय क्षत्रिय महासभाचे मराठवाडा अध्यक्ष पवनसिंह बैस, राज्य युवा सचिव महेशसिंह राठोड, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये नांदेड येथे दि.२९ फेब्रुवारी रोजी बैठक घेण्यात येऊन त्यामध्ये कंधार तालुक्यातील बारुळ येथिल कार्यक्रते ओमसिंग ठाकूर यांची अखिल भारतीय क्षत्रिय महासभाच्या तालुकाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली व तसे निवडीचे पत्र ठाकूर यांना प्रदान करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षापासुन बारुळ येथिल तरुण कार्यक्रते ओमसिंग गंगासिंग ठाकुर हे सामाजिक कार्यात सक्रीय असतात तसेच तरुणांचे मोठे संघटन त्यांच्याकडे आहे.सर्वच महापुरुषांचे विचार घेवून जयंती उत्सवात त्यांचा सहभाग असतो. या सामाजिक कार्याची दखल घेऊन ओमसिंग ठाकूर यांची अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या कंधार तालुकाध्यक्ष पदी निवड झाली आहे.

यावेळी भाजपा नेते निलेश भाऊ देशमुख, युवा नेते रोहित पाटील शिंदे, प्रशांत कोटावार, महेशसिंह राठोड, राजुसिंह ठाकूर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या निबडी बद्दल राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, डॉक्टर, व्यापारी संघटनांनी ओम ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या.