12 तारखेला गोपीनाथ गडावर जाणार, पण… : एकनाथ खडसे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपमध्ये नाराजीने डोके वर काढाले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे काही तरी वेगळा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. पंकजा मुंडे यांनी देखील काही दिवसांपूर्वी फेसबूक पोस्ट करत 12 तारखेला गोपीनाथ गडावर जमण्याचे आवाहन आपल्या समर्थकांना केले होते. त्यानंतर आज एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांची भेट झाली. तेथून बाहेर आल्यावर एकनाथ खडसेंनी आपण 12 तारखेला गोपीनाथ गडावर जाणार असल्याचे सांगितले.

एकनाथ खडसे म्हणाले की आज 12 तारखेला होणाऱ्या भगवान गडावरील कार्यक्रमावर चर्चा करण्यात आली. मी देखील 12 तारखेला भगवान गडावर जाणार आहे. परंतू कोणत्याही राजकीय भूमिकेवर भगवान गडावर काही बोलणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ते म्हणाले की भगवान गडावर राजकीय विषयांवर चर्चा होऊ नये असे गोपीनाथ मुंडे यांनी देखील सांगितले होते. त्यामुळे कोणतीही राजकीय भुमिका गोपीनाथ गडावरुन मांडणार नाही. कोणत्याही राजकीय भुमिकेवर चर्चा झाली का असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी यावर बोलणार टाळले.

खडसे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे, यावर प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर निर्णय सांगेन. तसेच आमच्या पक्षातून मनधरणीचा प्रश्नच उपस्थित होत नाही. मनधरणी करण्याचे कारण नाही. आम्ही पक्षातच होतो, पक्षासाठी आम्ही काम केले आहे. पक्षात अजून तरी मनधरणी वैगरीची चर्चा नव्हती. आता नवी काही पद्धत पडली असेल तर सांगता येत नाही असा खोचक टोला त्यांनी भाजप नेत्यांना लगावला.

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like