मोदीजींचा आदेश ‘सरआंखों’ पर म्हणत, सर्व मंत्री ९:३० वाजता कार्यालयात ‘हजर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्या पर्वाच्या कार्यालयीन कामकाजाला सुरुवात केली आहे. त्यात मोदींनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सकाळी साडेनऊ वाजताच कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आता कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह मंत्र्यांनीही आपले वेळापत्रक बनवण्यास सुरुवात केली आहे.

मोदींच्या निर्देशानंतर अनेक मंत्र्यांनी वेळापत्रकात कार्यालयाची वेळ ही नऊची केली आहे. केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्यासह मंत्री राम विलास पासवान यांनी आपल्या वेळापत्रकात बदल केला आहे. ज्याने ते कार्यालयात लवकर जाऊन आपल्या सचिवांसोबत दैनिक बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेता येईल.

टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राच्या अहवालानुसार, अनेक मंत्र्यांनी कार्यालयाचे कामकाज घरून करण्याचे बंद करत वेळेत कार्यालयात पोहचण्यास सुरुवात केली आहे. तर त्यातील काही मंत्री पूर्वीपासून लवकर येत होते ते आताही लवकर येऊन कामकाज पाहत आहेत.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय मंत्री हर्षवर्धन हे तर साडेनऊ वाजण्यापूर्वीच कार्यालयात पोहचत आहेत. तर नवनिर्वाचित मंत्री गजेंद्र शेखावतसह अनेक मंत्री मंत्रालयात वेळेवर येत आहेत.

दरम्यान, १३ जूनला मोदींनी सर्व मंत्र्यांना आपापले कामकाज करण्यासाठी कार्यालयात लवकर पोहचा. कार्यालयाचे कामकाज घरून करण्याचे टाळा. कर्यालयात येऊन काम करून दुसऱ्यांसाठी स्वतः उदाहरण बना, असं सांगितलं होते. तसंच यावेळी त्यांनी ४० दिवसांच्या संसदीय अधिवेशावेळी कोणीही दौरे करू नयेत, अधिवेशनात सर्वांनी उपस्थित राहवं, अशी आवाहने केली होते.

आरोग्यविषयक वृत्त –

 

 ‘सेक्स पॉवर’ जागृत करण्‍यासाठी करा योगासने

फक्त “दारूमुळेच” जगभरात दरवर्षी ६ टक्के लोकांचा मृत्यू 

पालकभाजी आरोग्यासाठी फायदेशीर 

“पॅरालिसिसकडे” दुर्लक्ष करू नका 

Loading...
You might also like